

Nitish Kumar political career
esakal
आशुतोष
नितीशकुमार यांच्यासाठी येणारी निवडणूक अखेरची असेल का? भारतीय जनता पक्ष त्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे का? निवडणुकीसाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे. मात्र, अजूनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही. नक्की काय घडते आहे? त्यांच्या आगामी काळातील राजकारणाची दिशा नक्की काय असेल?
नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील एक मुख्य नाव. गेल्या दोन दशकांपासून ते बिहारच्या राजकारणात आघाडीवर आहेत. काही महिन्यांचा अपवाद वगळता ते सातत्याने मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत. पहिल्यांदाच निवडणुकीपूर्वी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही, अशी स्थिती आहे. भाजप त्यांच्या नावाची घोषणाही करीत नाही आणि भाजपचा कोणीही वरिष्ठ नेता याबाबत जाहीरपणे काहीही भाष्य करीत नाही. सर्व सर्वेक्षणांमध्ये नितीशकुमार मागे आहेत.