
Nobel 2025
esakal
यंदाचे वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते विज्ञानाच्या तिन्ही मुख्य शाखांमध्ये मानवी प्रगतीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. तिघांच्या मूलभूत संशोधनातून रोगप्रतिकार प्रणालीबद्दल नवीन माहिती जगासमोर आली...
आपली प्रतिकारशक्ती आपल्यावरच का हल्ला करते? तो हल्ला आपल्याच प्रतिकारशक्तीच्या पेशी कशा परतवून लावतात? आपल्या हातातील स्मार्ट फोनवर एवढ्या वेगात आपण स्क्रीनची कशी काय हालचाल करू शकतो? वातावरणातील वाढता कार्बन डायऑक्साइड आणि अतिरिक्त पाणी शोषून घेऊ शकतो असा कोणता पदार्थ आहे का? हे मूलभूत आणि उपयोजित शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना यावर्षीचे वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले आहेत.