Premium|Double Taxation Avoidance Agreement : UAE मधील भारतीयांसाठी सुवर्णसंधी! 'DTAA' मुळे भारतातील गुंतवणूक आता होणार पूर्णपणे करमुक्त

NRI Investment India : भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील 'दुहेरी कर टाळण्याच्या करारा'मुळे (DTAA) अनिवासी भारतीयांना भारतातील म्युच्युअल फंड आणि सिक्युरिटीजमधील गुंतवणुकीवर पूर्णपणे करमाफी मिळू शकते.
Double Taxation Avoidance Agreement

Double Taxation Avoidance Agreement

esakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई- dvsatbhaiandco@gmail.com

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना भारतातील गुंतवणुकीचे आकर्षण वर्षानुवर्षे वाढत आहे. विशेषतः संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि त्यातील अबुधाबी येथे कार्यरत असलेले अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर भारतातील म्युच्युअल फंड, रोखे सरकारी सिक्युरिटीज, एआयएफ आणि विविध पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या भांडवली लाभावर भारतात प्राप्तिकर भरावा लागत नाही, अशी धारणा येथील अनिवासी भारतीयांची आहे. त्याबाबत सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.

युक्त अरब अमिराती (यूएई) आणि त्यातील अबुधाबी येथे कार्यरत असलेले अनिवासी भारतीय मोठ्या प्रमाणावर भारतातील म्युच्युअल फंड, रोखे सरकारी सिक्युरिटीज, एआयएफ आणि विविध पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. अशा गुंतवणुकीतून मिळणाऱ्या भांडवली लाभावर भारतात कर भरावा लागत नाही, अशी त्यांची धारणा आहे. ही धारणा कितपत बरोबर आहे? यामागील कायदेशीर आधार कोणता आहे? कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवरील लाभ करमुक्त आहे? काही करदाते, भारतात केलेल्या गुंतवणुकीवर लक्षणीय प्राप्तिकर सवलती मिळवितात, तर काही नाही. सर्वांना या सवलती का मिळत नाहीत? अशा सवलतींच्या रूपात मिळणारे फायदे नीट समजून घेण्यासाठी भारत व संयुक्त अरब अमिराती या दोन देशातील द्विपक्षीय दुहेरी कर टाळण्याच्या कराराच्या सर्व कलमांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक गुंतवणूकदार किंवा व्यावसायिकांना कदाचित परिचित नसलेल्या या करारातील काही तरतुदींच्या आकलनाच्या अडचणीमुळे आर्थिक गुंतागुंत होऊ शकते. म्हणून करसवलती मिळविण्यासाठी या सर्व प्रश्नांची स्पष्ट, कायदेशीरदृष्ट्या अचूक आणि विस्तृत माहिती असणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com