NOTA 12 years
Esakal
मुंबई - NOTA. None of the above. वरीलपैकी कोणताही उमेदवार मला मान्य नाही. भारतीय निवडणुकांमध्ये हा अधिकार येऊन तब्बल एक तप उलटलं. राजकारणाला वैतागलेली जनता, निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांकडून केले जाणारे आरोप या सगळ्या गोंधळात नोटाने तरी आतापर्यंत आपला हेतू साध्य केला आहे का असा प्रश्न पडतो. २०१३ मध्ये मिळालेल्या या हक्काचा खरोखरच नागरिकांना फायदा झाला आहे का? तो आणण्यामागचा हेतू खरंच साध्य झाला आहे का?
या १२ वर्षात नोटाच्या अधिकाराचा वापर लाखो नागरिकांनी केला आहे. १२ वर्षांमध्ये नोटाचा वापर कसा केला गेला? अशा काही घटना घडल्या का जिथे उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतं मिळाली? अशा वेळी काय निर्णय घेण्यात आले, याविषयीचे कायदे काय सांगतात, नोटासाठी सगळीकडे एकच नियम आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत.? २०२६ च्या या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने याविषयी माहिती घेऊया या सकाळ+ च्या विशेष लेखातून...