
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आंदोलन केले. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज या मागणीला विरोध दर्शवत आहे.
ओबीसी समाज मराठा समाजाच्या मागणीला विरोध का दर्शवत आहे, खरंच ओबीसी आरक्षण धोक्यात येईल का, यामागे काही राजकारण आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी नरेंद्र साठे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहेत.