
श्रद्धा श्रीकृष्ण परांजपे
जगभरातील लठ्ठ लोकांच्या आकडेवारीत आता भारताचं वजन वाढलं आहे कारण १५-२४ वयोगटांतील सगळ्यात जास्त लठ्ठ लोक भारतात असणार आहेत. तर ५-१४ म्हणजे लहान मुलांमधील लठ्ठपणाचा विचार केला तर जगभरात आपला दुसरा क्रमांक लागतो आहे. या दोन्ही गटातील जगभरातील लोकसंख्या आहे ७४.६ कोटी आणि त्यातील तब्बल ९.४ टक्के भारतीय असतील, असा अंदाज आहे. हा अंदाज ग्लोबल बर्डन ऑफ डिझिज स्टडी बी. एम. आय. कोलॅबोरेटर्स यांनी व्यक्त केला आहे. ‘द लॅन्सेट’ मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.