

Metal Organic Framework
esakal
विज्ञान क्षेत्रातील ‘नोबेल’ पुरस्कार नुकताच म्हणजे १० डिसेबर रोजी प्रदान करण्यात आला. यावेळच्या विजेत्यांमध्ये एक नाव विशेष लक्ष वेधून घेणारे आहे, ते म्हणजे ओमार याघी. ‘शरणार्थी’ ते ‘नोबेल विजेता’ असा असामान्य जिद्दीचा त्यांचा प्रवास आहे. त्यांचा जिद्दीचा प्रवास आणि त्यांचे संशोधन याविषयी.
धातूंनी युक्त अंतर्गत पोकळ्या किंवा छिद्रे असणाऱ्या सेंद्रिय रासायनिक आराखडे किंवा रचना असलेल्या (मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क - एम. एफ. ओ.) पदार्थांची निर्मिती केल्याबद्दल व त्यांचे जीवनोपयोगी महत्त्व सिद्ध केल्याबद्दल ओमार याघी यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील रिचर्ड रॉबसन, जपानमधील टोकियो विद्यापीठातील सुसुमा कितागावा या शास्त्रज्ञांना या वर्षाचे रसायनशास्त्रातील ‘नोबेल’ मिळाले. बहुतेक सर्वच रासायनिक पदार्थ कमीअधिक प्रमाणात भरीव असतात, तर स्पंज वगैरे पदार्थांमध्ये पोकळी, छिद्रे किंवा रिकाम्या जागा असतात. जर पदार्थाच्या अंतर्गत भागात पोकळी किंवा छिद्रे असतील, तर अशा पदार्थाचे अतिशय वेगळे उपयोग असू शकतात जे नेहमीच्या भरीव पदार्थांचे नसतात.