Online investment fraud through fake WhatsApp groups in India
esakal
Premium|Online investment scam : सायबर चोरट्यांचा सापळा; आकर्षक योजनांच्या आमिषाने आठ कोटींची फसवणूक
शिरीष देशपांडे-deshpande.06@gmail.com
आपले पैसे झटपट कसे वाढतील, अशा विचाराने गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना इंटरनेटवर पसरणाऱ्या खोट्या आकर्षक योजनांनी ग्रासले आहे. काही वेळा जिवावरही बेतण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहण्याची मोठी गरज आहे.
लीकडेच एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी आठ कोटी रुपयांना फसवले आहे. एका आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या वेल्थ मॅनेजमेंट करणाऱ्या मोठ्या ग्रुपच्या नावावर अधिकाऱ्याला एका फसव्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे दाखल करून घेतले गेले. सुरवातीला खूप आकर्षक योजना, त्यात रोज होणारा नफा, अनेकांनी सांगितलेल्या यशाच्या बोगस गोष्टी यामुळे हे अधिकारी त्यामध्ये अलगद अडकत गेले. त्यामध्ये असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांना विविध आकर्षक योजनांमध्ये गुंतवणूक करायला लावली. रोज संध्याकाळी स्वतः सीईओ माहिती द्यायचे. आकर्षक महिला वैयक्तिक सल्ला देत असे, रोज होणारा फायदा डॅशबोर्डवर दाखवला जात असे, ते बघून अधिकारी खूष होत होते आणि अधिकाधिक गुंतवणूक करत होते.

