
डॉ. केशव साठये
कलात्मक चित्रपट काढायचा या ध्यासाने पछाडलेले कलावंत झोकून देऊन काम करतात खरे; पण हे करताना आपली निर्मिती ही जागतिक व्यासपीठावर उठून दिसायला हवी, त्यासाठी त्याची हाताळणीही सर्जनशीलतेच्या निकषावर समृद्ध असायला हवी, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहोळ्याच्या निमित्ताने केलेली चिकित्सक नोंद.