
ऋषिराज तायडे
rushirajtayde@gmail.com
डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासामुळे देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही तितक्याच लक्षणीय वेगाने वाढली. मोबाईल, लॅपटॉपसह स्वस्त आणि सहज उपलब्ध झालेल्या इंटरनेटमुळे भारतीयांची डिजिटल विश्वात मुशाफिरी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मागील वर्षात देशातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ५.५ टक्के वाढ झाली.
सध्या देशातील एकूण लोकसंख्येच्या ५५.३ टक्के म्हणजे ८०.६ कोटी लोकसंख्या इंटरनेटचा नियमित वापर करतात. त्यापैकी ९६ टक्के लोकसंख्या मोबाईलवर इंटरनेट वापरत असल्याचे मेल्टवॉटरच्या अहवालात नमूद केले आहे.