
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
‘गावात खरंच शांतता होती, जी आम्ही बिघडवली? खरोखरीच पाटलांनी तुम्हाला पोटच्या मुलासारखं वागवलं? तलाठी, ग्रामसेवक तुम्हाला या गुलामीतून सोडवतील? आम्ही परत जाऊ?’ या प्रश्नांनी मला वेठबिगारांना अंतर्मुख करायचं होतं. मला त्यांना त्यांच्याविषयी, त्यांच्या गुलामीत खितपत पडलेल्या आयुष्याविषयी विचार करायला उद्युक्त करायचं होतं. या प्रश्नांची उत्तरं आम्हाला माहीत होतीच, म्हणून तर आम्ही इतकी वर्षं घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांच्यासोबत संघर्ष करीत होतो. परंतु ही उत्तरं त्यांची त्यांना मिळावीत आणि त्यांनी त्यांच्यावरील अन्यायाविरोधात चिडून उठावं, ही माझी भूमिका होती...