Premium| Overthinking Effects : अतिविचाराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात?

Mental Health : अतिविचार ही फक्त सवय नसून ती एक गंभीर मानसिक समस्या ठरू शकते. योग्य उपायांनी या साखळीतून बाहेर पडणं शक्य आहे
Overthinking

Overthinking

esakal

Updated on

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राला त्याच्या बॉसचा मेसेज आला की उद्या ऑफिसला लवकर ये, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे! त्या मेसेजमुळे तो खूप अस्वस्थ झाला. बॉसला माझा कामचुकारपणा लक्षात आला असेल का? माझ्याकडून काही मोठी चूक झाली नसेल ना? मला नोकरीवरून तर काढून टाकणार नाहीत ना? नोकरी गेली तर माझ्या ईएमआयचं काय होईल? इतक्या वर्षांपासून जपलेली एसआयपी मोडावी लागेल का? असे कितीतरी प्रश्न त्याच्या डोक्यात आले. या एका मेसेजमुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर समजलं की गोष्ट एकदम छोटी होती. पण याने मात्र या गोष्टीचा विचार करत रात्र घालवली होती. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींचा गरजेपेक्षा जास्त विचार करण्याच्या प्रवृत्तीला मानसशास्त्रात अतिविचार म्हणजेच Overthinking म्हणतात.

अतिविचार करण्याचा तुमच्या मनावर आणि शरीरावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होत असतो. एन्झायटी डिसऑर्डर, डिप्रेशन, इनसोम्निया अशा कितीतरी आजारांचा जन्म Overthinking मधूनच होतो. एकंदरच अतिविचार केल्याने तुम्ही मानसिक आणि शारीरिक समस्यांच्या दलदलीत कसे फसत जाता हे आपण या लेखातून जाणून घेवूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com