

Pablo Picasso paintings
esakal
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या चित्रांमधील भावनिक आशय म्हणजे त्यांच्या आयुष्यातील अंतःकरणातील भावनांचे रूपांतरण... पिकासोंच्या भावनांचा प्रवास त्यांच्या चित्रशैलीच्या प्रत्येक टप्प्यात दिसून येतो. त्यांच्या चित्रांमधील भावना म्हणजे मानवी अवस्थांचे दृश्य भाषांतर. आज २५ ऑक्टोबर रोजी त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या निधनाला ५२ वर्षांचा काळ लोटला तरीही काळाच्या ओघात त्यांचे प्रेरणादायी वलय तीळमात्रही धूसर झालेले नाही.
राफेलसारखे रंगविण्यासाठी मला चार वर्षे लागली; पण लहान मुलासारखे रंगविण्यासाठी मला आयुष्यभर लागले : पाब्लो पिकासो...
पाब्लो पिकासो यांचा जन्म २५ ऑक्टोबर १८८१ रोजी स्पेनच्या आंदालुसिया प्रांतातील मालागामध्ये झाला. १४४ वर्षांपूर्वी... ८ एप्रिल १९७३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला ५२ वर्षांचा काळ लोटला; पण तरीही काळाच्या ओघात त्यांचे प्रेरणादायी वलय तीळमात्रही कमी अथवा धूसर झाले नाही. जगात कोणत्या ना कोणत्या ऑक्शन हाऊसद्वारा त्यांचे कोणते ना कोणते पेंटिंग वर्तमानपत्रातून चर्चेत असतेच.