

Pachhat Book
esakal
अर्जुन डांगळे - sakal.avtaran@gmail.com
योगीराज बागूल यांच्या ‘पाचट’ आत्मकथनाला दलित समाजावर प्रस्थापित व्यवस्थेने लादलेले दैन्य, दु:ख आणि अपमान यांची पार्श्वभूमी तर आहेच; पण असंघटित अशा ऊसतोड कामगारांच्या व्यथा आहेत. त्यांच्या वेदना, गुलामीचे जिणे, पिळवणूक आणि जगण्यासाठीचा संघर्ष असा संयमित; पण समर्थ असा पट लेखकाने त्यातून उभा केला आहे.