
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे बदलते तंत्र समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘टार्गेटेड किलिंग’चा प्रवाह काश्मीरमध्ये दिसून येतच होता; पण धर्म विचारून हत्या करण्यातून दहशतवाद्यांना सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करायची आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना या धार्मिक आधारावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ताज्या हल्ल्याच्या माध्यमातून इतर धर्मीयांनी जम्मू-काश्मीरमध्ये येऊ नये असा इशारा दहशतवाद्यांना द्यावयाचा आहे.