Pakistan constitutional crisis
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium| Pakistan constitutional crisis: असीम मुनीर यांची सत्ता आणि पाकिस्तानची अस्थिरता
Asim Munir power: पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. या घडामोडींचे दूरगामी राजकीय परिणाम दिसून येत आहेत
रवी पळसोकर
अफगाणिस्तान सीमेवरील हिंसाचार, खैबर पख्तुन्वा प्रांतीय सरकारचा घटनादुरुस्तीच्या विरोधात राजीनामा आणि असीम मुनीर यांच्या हाती सर्व सत्ता एकवटणे या घटनांत परस्परसंबंध आहेत. धागेदोरे नीट जुळवले तर हा संबंध स्पष्ट होतो.
पाकिस्तानी लष्करशहाचे इरादे
पाकिस्तानची खैबर पख्तुन्वा प्रांतातील अफगाण सीमा धगधगत आहे व अशांतता संपण्याची शक्यता कमी आहे. हिंसाचाराबद्दल दोन्ही देशांचे आरोप, प्रत्यारोप चालू आहेत. एके काळी पाकिस्तानचे तालिबानशी संबंध चांगले होते व ते सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानला अफगाणिस्तानचा प्रदेश खरोखरीच ‘सामरिक खोलाई’साठी आणि राखीव प्रदेश म्हणून वापरता येईल वाटणे साहजिक होते. वास्तव वेगळेच निघाले. तालिबानी अफगाण शासन आणि पाकिस्तान यांचे संबंध बिघडायला फार वेळ लागला नाही.

