
संकेत कृष्णात पाटील
समृद्धता, नश्वरता, भौतिक मुक्तता, एकांतवाद, अनेकांत वाद अशा तुमच्या असंख्य तात्त्विक विचारांना व्यावहारिक कसोट्या देण्याचं सामर्थ्य पन्नास किलोमीटरच्या पायवाटेत आहे. दृष्टी आणि दृष्टिकोनातला फरक वारंवार गडद होत जातो.
चौकटीच्या बाहेरचे जग, निसर्गाच्या संघर्षाचे नियम शिकवणारी ही बिनभिंतीची शाळा नक्कीच प्रेरणादायी ठरेल एवढं मात्र निश्चित!