Premium|Why do children fear their Parents: मुलं आईवडिलांना का घाबरतात? शिस्त आणि भीती यांच्यातल्या फरकाबाबत मानसशास्त्र काय सांगतं?

Parenting Guide: भीतीची cycle कशी तयार होते? आणि ती ब्रेक करायची सुरूवात कुठून करावी? जाणून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून
Fear of parents

Fear of parents

Esakal

Updated on

पुणे- इयत्ता नववीत शिकणारा हर्षवर्धन अभ्यासात जेमतेमच. वजन जास्त वाढत चाललं म्हणून आईवडिलांनी त्याला जीम लावली. जेणेकरून त्याचा व्यायाम होईल. याचदरम्यान त्याला बॉडी बनवायचं वेड लागलं. जीममध्येच त्याला कोणीतरी सांगितलं की, जर ही प्रोटीन पावडर खाल्ली तर लवकर बॉडी होते. हर्षवर्धनने त्याच्या साठलेल्या पैशातून आईवडिलांच्या नकळत ती पावडर मोठ्या प्रमाणात विकत घेतली व ती खाऊ देखील लागला.

त्याच्या वागण्यातला बदल त्याच्या आजीला जाणवला. तो काहीतरी लपवतो आहे, बॅगला हात लावू देत नाही हे आजीच्या लक्षात आल्याने आजीने बॅग चेक केली तेव्हा त्याच्याकडे ही पावडर असल्याचं समोर आलं. त्यानंतर घरात एक कोर्ट भरवलं गेलं. त्याला जाब विचारले गेले, जवळच्या नातेवाईकांमध्ये या घटनेची चर्चा केली गेली. यातून त्या मुलाच्या मनात चांगलीच भिती बसली.

मुलं वाढवत असताना थोड्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक पालकासमोर असे काहीसे प्रसंग येत असतात. ज्यातून मुलं एकतर तुम्हाला घाबरून तुमच्यापासून लांब जातात किंवा विश्वसाने तुम्हाला सगळं खरं सांगतात.

पालकांची प्रतिक्रिया काय आहे त्यानुसार गोष्टी घडत जातात.. पण मुळात पालकांमधील चिंता आणि मुलांवरचं नियंत्रण हा मेळ कसा साधायचा? जेव्हा अशा काही गोष्टी घडत असतात तेव्हा मुलांना नेमकं काय वाटतं.. पालकांचा विचार काय असतो आणि या विषयात झालेले अभ्यास काय सांगतात? मुलं जर पालकांना घाबरत असतील तर ही भितीची सायकल कशी ब्रेक करायची, याविषयी बालमानसशास्त्राच्या अभ्यासक श्रृती पानसे काय म्हणतात? हे सगळं सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Fear of parents
Premium| Delhi Student Protest: जीवन संपवण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत विद्यार्थी का पोहोचतायेत? यामागचं मानसशास्त्र काय सांगतं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com