Student Mental helath
Esakal
पुणे – "मम्मी-पापा, मुझे माफ़ कर दीजिए। मुझे पता है कि आपको मुझ पर पूरा भरोसा था कि आपकी बेटी मेहनत करके एक दिन डॉक्टर बनेगी। लेकिन मुझमें दोबारा NEET की परीक्षा देने की हिम्मत नहीं बची है। पहली बार मैंने अच्छे अंक हासिल किए थे, फिर भी परीक्षा दोबारा देनी पड़ रही है। अब यह भरोसा नहीं रहा कि अगली बार भी मेरा पेपर अच्छा जाएगा। मुझे ऐसा लग रहा है कि मैंने आपकी उम्मीदों पर पानी फेर दिया। मुझे माफ़ कर दीजिए।"
आपल्या आईवडिलांना हे पत्र लिहित १७ वर्षीय आकांक्षा चतुर्वेदीने आपले जीवन संपवले. आणि फक्त आकांक्षाच नाही तर तिच्यासह १७ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा रद्द झाल्याने आपले जीवन संपविले आहे. याच कारणासाठी भारतभरातून अनेक विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करतायेत. या मुलांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे.
या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी घराच्या बाहेर राहून १८- १८ तास अभ्यास केलेला आहे, अनेकांनी आईवडिलांकडून पैसे घेत क्लासेस लावले आहेत. कोणी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास केला आहे, तर कोणी आता अभ्यास करूनच थकलं आहे. या सगळ्या परिस्थितीत स्वत:मधील हे धैर्य टिकवून ठेवणे हे विद्यार्थ्यांसमोरील खूप मोठे आव्हान आहे.
स्पर्धा परीक्षांमधील पेपर लीक, घोटाळे, कोर्टाच्या फेऱ्या आणि निकाल लागण्यास लागणारा वर्षानुवर्षांचा वेळ यांमुळे हा तरुण वर्ग हतबल झाला आहे. या सगळ्या परिस्थितीत परीक्षा पद्धतीमधील त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाई नक्कीच आहे, पण व्यवस्था सुधारेपर्यंत आपण आपल्या मुलांचे जीव कसे वाचवणार? चुका व्यवस्थेच्या आहेत, तर मग शिक्षा विद्यार्थ्यांनी स्वतःला का द्यायची? या गंभीर प्रश्नाचा मागोवा घेत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या सकाळ+ च्या माध्यमातून आपण विद्यार्थी जीवन संपवण्याच्या निर्णयापर्यंत कसे पोहचतात, यामागे मानसशास्त्रीय कारणं काय आणि या सगळ्यात न अडकण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून.