
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
नवे वर्ष कसे साजरे करायचे यावर सोसायटीच्या मीटिंग होतात; पण परीक्षेच्या काळात काय काळजी घ्यायची, यावर काही चर्चा होत नाही. ज्यांच्या मुलांची परीक्षा असते तेच पालक फक्त तेवढ्याच काळात आवाजावर बोलतात. अशा समस्यांच्या परीक्षेची तयारीही केली पाहिजे.
परीक्षेवर घरोघर चर्चा चालू आहे. आपणपण करायला हरकत नाही; पण कसली चर्चा? आपण सामान्य माणसं. आपण अडचणीवर बोलू शकतो. मार्गदर्शन काय करणार? त्यापेक्षा सरळ सरळ या काळात येणाऱ्या अडचणी बोलू या... सगळ्यात मोठी अडचण म्हणजे लोक परीक्षेच्या काळात खूप बोलतात परीक्षेवर. सतत घाबरवत राहतात मोठी माणसं किंवा आपण कसा अभ्यास केला, हे बोलत राहतात.