Premium|Passive Investing Strategies : इंडेक्स फंड की सतत खरेदी-विक्री; गुंतवणुकीसाठी काय योग्य?

Passive Investing and Factor Investing : बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेऊन सतत खरेदी-विक्री करण्याऐवजी इंडेक्स फंडातून गुंतवणूक करावी का? फॅक्टर इन्व्हेस्टिंग, जोखीम विभागणी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व धनंजयराव-छोटू यांच्या संवादातून समजून घ्या.
Passive Investing Strategies

Passive Investing Strategies

esakal

Updated on: 

विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com

सर्वसामान्य गुंतवणूकदाराने बाजारातील चढ-उतारांचा अंदाज घेत सतत खरेदी-विक्री करत राहावे, की इंडेक्स फंडाच्या माध्यमातून पॅसिव्ह गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारावा? इंडेक्स फंडापेक्षा वेगळे फॅक्टर इन्व्हेस्टिंग कितपत उपयुक्त ठरू शकते आणि अशा गुंतवणुकीत जोखीम कशी विभागता येते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बर्टन मलकीएल यांच्या ‘अ रँडम वॉक डाउन वॉल स्ट्रीट’ आणि जॉन बोगल यांच्या ‘द लिटल बुक ऑफ कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग’ या पुस्तकांतून मिळतात. या पुस्तकांवर आधारित गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पना उलगडणारा धनंजयराव आणि छोटू यांच्यात रंगलेला हा मिस्कील संवाद... (भाग २)

धनंजयराव नुकतेच काही रिपोर्ट वाचून त्यावर मनन करत बसले होते. हातात पाईप, तोही न पेटवलेला, कपाळावर आठ्या आणि नजर शून्यात... यावरून त्यांची मानसिक गणिते सुरू आहेत, असे तिऱ्हाइतालाही वाटले असते; पण इथे तर छोटू होता. त्याला इतक्या वर्षांत धनंजयरावांच्या सगळ्या सवयी पाठ झाल्या होत्या. तो शांतपणे आपले काम करत होता. योग्य वेळी आपल्याला हाक ऐकू येईलच, याची त्याला पक्की खात्री होती. आणि तसेच झाले.

‘‘छोटू... कुठे आहेस? इकडे ये बरे, लवकर!’’ धनंजयराव लांबूनच ओरडले.

‘‘आलो, आलो,’’ असे म्हणत मुद्दाम अतिशय शांतपणे आपला वेळ घेत, संथपणे तो धनंजयरावांकडे गेला. मुद्दाम त्यांना उचकावले, की थोडे ऐकून घ्यावे लागते; पण आपली हुशारी दाखवण्यासाठी आणि त्याने कसा वेडेपणा केला आहे, हे सांगण्यासाठी धनंजयराव नवनवी माहिती द्यायला लागतात, हा त्याचा अनुभवच होता.

Loading content, please wait...