Premium|Gum Disease And Stroke Connection : दातांच्या आरोग्याचा निरोगी धडा

Oral Health Risk Factors हिरड्यांच्या आजारामुळे निर्माण होणारी अंतर्गत जळजळ रक्तवाहिन्यांचे नुकसान करते. दातांची खराब आरोग्य स्थिती आणि स्ट्रोक यांचा परस्पर थेट संबंध नुकत्याच एका संशोधनातून दिसून आला आहे.
Gum Disease And Stroke Connection

Gum Disease And Stroke Connection

esakal

Updated on

डॉ. नानासाहेब थोरात - sakal.avtaran@gmail.com

हिरड्यांचा आजार आणि हृदयविकार यांचा थेट संबंध असू शकतो का? दातात कॅव्हिटी आणि हिरड्यांचा आजार असलेल्यांना इस्केमिक स्ट्रोकचा धोका अधिक असू शकतो, असे संशोधन नुकतेच अमेरिकी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. साहजिकच त्यातून मौखिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित होते.

कल्पना करा, की आपले मुख म्हणजे एक बहरलेली बाग आहे. आपल्या हिरड्या म्हणजे माती आणि दात म्हणजे तिच्यात उगवलेली रोपे आहेत. हळूहळू माती जशी पोषक होत जाईल तसतशी तिच्यात रोपे उगवत जातील. काही रोपे उगवताच कोमेजून जातील... काही जोमाने बहरतील. जर मातीला संसर्ग झाला आणि रोपे कुजायला लागली, तर संपूर्ण बाग बिघडते. त्याहून वाईट म्हणजे, मातीत झालेला संसर्ग शरीररूपी ‘पाणीपुरवठा प्रणाली’ म्हणजेच आपल्या रक्तप्रवाहात पसरू शकतो आणि असा दूषित रक्तप्रवाह संपूर्ण शरीरात बिघाड करू शकतो... याच बागेचा म्हणजेच आपल्या मुखाचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांना दिसून आले, की ज्या व्यक्तींना दातांच्या पोकळ्या (कॅव्हिटी) आणि हिरड्यांच्या आजाराचा एकत्रित त्रास असेल तर त्यांना इस्केमिक स्ट्रोकचा (मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारा स्ट्रोक) धोका अधिक असू शकतो. असे संशोधन नुकतेच ऑक्टोबर महिन्यात ‘न्यूरोलॉजी’ या अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या अधिकृत जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनातून असे दिसून आले आहे, की दातांची खराब आरोग्य स्थिती आणि स्ट्रोक यांचा परस्पर संबंध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com