
मयूर भावे
काळाच्या कोणत्याही प्रहराला न बांधलेली शांतता समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या हातात हात गुंफून वाहत असते, जगात कुठेही न बोलल्या गेलेल्या भाषेत आणि कधीही न लिहिल्या गेलेल्या लिपीत ‘सागर’ नावाचा हा अथांग कलाकार आपल्याशी संवाद साधतो. पाऊस पडावा यासाठी स्वतःचं बाष्पीभवन करून घेणारा समुद्र कधीही आपलं जीवन ‘अळणी’ होऊ देत नाही! समुद्रकिनाऱ्यावरून चालताना उमटणारी पावलंंंंंं आपल्या अस्तित्वाच्या खुणा सांगत असतात. त्याची येणारी प्रत्येक लाट आपल्या पाऊलखुणा पुसत जाते. त्यामुळेच कुसुमाग्रजांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणावसं वाटतं... ‘किनारा मला पामराला!’