

special additional excise duty on fuel
With the Help of AI
Global Oil Shock: How India Is paying for fuel tax? Amid Rising Crude
देशभरात ज्या पेट्रोल, डिझेलमुळे संशयाचा वणवा पेटलाय त्या इंधनावर आपण नेमका किती कर भरतो, हे माहितीय का तुम्हाला? नुकतंच २६ मार्चला केंद्र सरकारने राजपत्र अधिसूचना काढली आणि सांगितलं की, पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात सरकारने मोठी कपात केली आहे. इराण-इस्राएल युद्धामुळे मध्यपूर्वेत सगळीच परिस्थिती गंभीर आहे. इंधन पुरवठ्याला प्रचंड धोका आहे. तेल विपणन कंपन्यांवरचा ताणही वाढलेला आहे, अशावेळी सरकारचा हा निर्णय काहीसा दिलासादायक वाटतोय. त्यामुळे किमान या घडीला तरी देशात इंधनवाढीचा भडका उडालेला नाही.