Premium|Philanthropy and Nation Building : समाजहित म्हणजे केवळ श्रीमंतांची जबाबदारी नव्हे; प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा

Philanthropy and Nation Building : भारताच्या विकासातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी आणि रोजगाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजहिताचे योगदान महत्त्वाचे आहे. आर्थिक परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक नागरिक नियोजनबद्ध सहभागातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देऊ शकतो.
Philanthropy and Nation Building

Philanthropy and Nation Building

esakal

Updated on: 

तेजल वाजे - Tejal@sevatarang.org

भारताची अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत असली, तरी शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या मूलभूत गरजा अजूनही अनेकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. या गरजा पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी सरकारची असली, तरी समाजहितातून होणारे नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण योगदान सार्वजनिक प्रयत्नांना पूरक ठरू शकते. त्यामुळे समाजहित म्हणजे सक्षम समाजव्यवस्था आणि सर्वांगीण राष्ट्रनिर्मितीत नागरिकांचा सहभाग नोंदविण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. (भाग ३)

भारत हा १४० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला, मोठी आर्थिक क्षमता आणि तितक्याच मोठ्या सामाजिक गरजा असलेला देश आहे. गेल्या काही दशकांत भारताने मोठी आर्थिक प्रगती केली असली, तरी आजही अनेक लोकांना किमान शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि उपजीविकेच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. म्हणूनच समाजहित (फिलाँथ्रॉफी) ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी नव्हे किंवा ‘मानसिक समाधानासाठी केलेला खर्च’ नव्हे. भारतासमोरील विकासाची आव्हाने सोडविण्यासाठी समाजहित हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी कोणाला श्रीमंत असण्याची गरज नाही. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा वेतनधारक व्यक्तीदेखील विचारपूर्वक आणि सातत्याने केलेल्या योगदानातून सक्षम राष्ट्रनिर्मितीत सहभागी होऊ शकते.

Loading content, please wait...