

PM Modi Three Nation Visit
esakal
द्विपक्षीय संबंधांबरोबर बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेच्या दृष्टीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांचा दौरा महत्त्वाचा ठरला. हे महत्त्व नेमके कशामुळे आहे, याचा लेखाजोखा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर १५ ते १८ या चार दिवसांमध्ये जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांचा दौरा केला. या भेटीमुळे भारताचे या तीन देशांशी असलेले द्विपक्षीय संबंध दृढ होण्यास मदत होईलच, पण या दौऱ्याचे महत्त्व बहुध्रुवीय राजकारण आणि भारताच्या जागतिक घडामोडींमधील मुत्सद्देगिरीमध्येही आहे.
भौगोलिक आणि व्यूहात्मक दृष्टीने हे तिन्ही देश आपापल्या प्रांतात महत्त्वाचे आहेत आणि त्या-त्या प्रांतांच्या राजकारणात त्यांची मोठी भूमिका असते.