
मुंबई: भारतामध्ये कोविड काळात अनेक छोटे उद्योग कोलमडून पडले. त्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील उद्योगांचा समावेश होता. या उद्योगांना वाचवण्यासाठी आणि पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली होती. या योजनेचा आतापर्यंत अनेक लोकांना लाभ झाला आहे. या योजनेत अजून सुधारणा करून आता पुन्हा नव्याने ही योजना लागू करण्यात आली आहे.
पूर्वी सुरुवातीला मिळणारी १० हजारांची रक्कम आता वाढवून १५ हजार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५० लाख नवीन विक्रेत्यांना कर्ज मिळणार आहे. शिवाय UPI लिंक क्रेडिट कार्ड आणि कॅशबॅकची सुविधा उपलब्ध असल्याने या उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.
या योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे? आता पर्यंत या योजनेचा किती लोकांना आणि कसा उपयोग झाला आहे? या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.