
डॉ. सदानंद मोरे
राष्ट्रातील लोकांना आपापल्या राष्ट्रांचा अभिमान असणे, इतकेच नव्हे तर त्या त्या राष्ट्रांनी वर्चस्वासाठी एकमेकांशी संघर्ष करणे (की ज्याची मर्यादा महायुद्धापर्यंत पोहोचवली) हा भाग वेगळा. आपली राष्ट्रे ज्या खंडात आहेत ते खंड सर्वश्रेष्ठ आहेत व समग्रपणे विचार केला असता त्याचे वर्चस्व उर्वरित जगावर असायला हवे असा विचार पहिल्यांदा युरोपात बळावला.
याला युरोप केंद्रित किंवा युरो केंद्रित विचार म्हणू या. आता त्याकाळात, उदाहरणार्थ अशा प्रकारचा खंडविचार भारतात नसल्यामुळे आणि ज्या खंडात वास्तव्य करतो ते खंड सर्वश्रेष्ठ आणि त्याचे वर्चस्व सर्व इतरांनी स्वीकारले पाहिजे अशी आकांक्षाही भारतामधील लोकांमध्ये असायचे कारण नाही.