
आशुतोष
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीपेक्षाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार, त्यामागील भाजप आणि संघ यांच्यातील संबंध या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातूनच, भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि भविष्यातील पक्षाची वाटचाल या गोष्टींचेही संकेत मिळत आहेत.
जगदीप धनकड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, ‘बडे अब्रू होके तेरे कूचे से हम निकले’ या शेरची नक्कीच आठवण होते. धनकड आज कोठे आहेत, याची माहिती कोणालाही नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, असे काही जण सांगतात. तर, ते काही कालावधीसाठी भूमिगत झाले आहेत, अशीही चर्चा आहे. वास्तव काय आहे, हे मात्र कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.