
Poliyical
Political power
बाबा जेव्हा जेव्हा मोबाईल बाजूला ठेवून बोलतात, तेव्हा ते खूप महत्त्वाचं असतं. पायावरून साप जावा आणि आपण थिजून उभं राहावं, असा असतो मी अशा वेळी. पूर्ण लक्ष बाबांच्या बोलण्याकडे. बाबा कधी कधी एवढं सुपर बोलतात ना, की रेकॉर्ड करावं वाटतं... सामान्य माणसं त्यांच्या आयुष्यात तारेवरची कसरत करतात. राजकारणात तसं नाही. तार नसली तरी तारेवरची कसरत करावी लागते, असं ते सांगतात.
राजकारणी व्हायचं म्हणजे फुटलेल्या फुग्यात हवा भरता आली पाहिजे... मोबाईल बाजूला ठेवत बाबा सांगू लागले. बराच वेळ रील बघून डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यासाठी त्यांनी हलक्या हाताने डोळे चोळायला चालू केले. पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाले, सांग जमणार आहे का तुला हे? तर जा राजकारणात... ते काही इंजिनिअरिंग किंवा स्पर्धा परीक्षा नाही फॅशन म्हणून करायला. काय करायचं हे सुचत नाही म्हटल्यावर ‘चला राजकारणात जाऊ’ एवढं सोप्पं नाही राजकारण.
बाबा जेव्हा जेव्हा मोबाईल बाजूला ठेवून बोलतात, तेव्हा ते खूप महत्त्वाचं असतं. पायावरून साप जावा आणि आपण थिजून उभं राहावं, असा असतो मी अशा वेळी. पूर्ण लक्ष बाबांच्या बोलण्याकडे. बाबा कधी कधी एवढं सुपर बोलतात ना, की रेकॉर्ड करावं वाटतं. बाबांनी सोफ्यावर पाय वर घेऊन मांडी घातली आणि बोलू लागले...