

PFAS Pollution Returns: The Italian Factory That Poisoned 3.5 Lakh People Now in India?
E sakal
Industrial Pollution and Policy Gaps: How Lote-Parshuram Faces an Environmental Time Bomb
चिपळूणजवळ लोटे-परशुराम एमआयडीसी आहे. लोट्याच्या माळावर वसलेली ही औद्योगिक वसाहत म्हणजे चिपळूण शहरासाठी एकाचवेळी तारक आणि मारक आहे. मारक यासाठी की, इथून होणारं प्रदूषण. अगदी वाहनातून गेलात तरी येणारा वास, सोडलं जाणारं औद्योगिक सांडपाणी. तारक अशासाठी की, इथे चिपळूण आणि आसपासच्या परिसरातील लोकांना मिळणारा रोजगार.
तर इथेच एक नवी फॅक्टरी बांधली जाते आहे. फॅक्टरी नवी असली तरी त्यातली यंत्रसामग्री मात्र जुनीच आहे बरं का. ही यंत्रसामुग्री आली आहे, इटलीच्या व्हिसेंझातील मिटेनी फॅक्टरीतून.
आता या सगळ्यात खटकण्यासारखं काय आहे, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे, ही फॅक्टरी जगातील सगळ्यात भयंकर अशा पर्यावरणीय घोटाळ्यात अडकली होती. त्यामुळे त्यांच्या संचालक मंडळांना इटलीच्या न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. २०१८मध्ये ही फॅक्टरी बंद पडली होती.
आता मात्र याच कंपनीतील तीच प्रदूषण करणारी यंत्रसामग्री घेऊन चिपळूणजवळ एक फॅक्टरी उभ राहत आहे. काय आहे विषय, समजून घेऊ सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.