
संगणकाच्या युगात आणि मोबाईलच्या जमान्यात एसएमएस आणि इमोजीच्या रूपात तसेच व्हॉइस मेसेजच्या स्वरूपात संपर्क साधला जात असताना प्रत्यक्षात मात्र आज-काल पोस्ट कार्ड, अंतर्देशीय पत्र आदी गोष्टी कालबाह्य झाल्या तरीही परीक्षा पद्धतीत मात्र विद्यार्थ्यांना पत्रलेखन हा विषय आहे. याशिवाय अहवाल लेखन, निबंध, सारांश लेखन अशाही बाबींचा समावेश आहे. मात्र सध्या संभाषणात असणाऱ्या भाषेत व्याकरणाचा फारसा विचार केला जात नाही.