

Epstein Files- Elite Deviance and Power Structure
esakal
लेखक : सत्यजीत हिंगे
जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, अब्जाधीश, राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटी यांच्याभोवती गुंफलेली एपस्टीन फाइल्स ही केवळ एका व्यक्तीची किंवा एका गुन्हेगारी प्रकरणाची कथा नाही; तर ती आधुनिक समाजातील सत्तासंरचना, लैंगिक शोषण, वर्गीय असमानता आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादा उघड करणारी सामाजिक वास्तवाची कथा आहे.
सामाजिक दृष्टीकोनातून पाहता, एपस्टीन प्रकरण हे एलिट डेव्हियन्स (Elite Deviance) चे क्लासिक उदाहरण आहे. समाजशास्त्रज्ञ सी. राइट मिल्स यांनी वर्णन केलेल्या ‘Power Elite’ संकल्पनेप्रमाणे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा असलेला वर्ग अनेकदा कायद्याला जुमानत नाही. एपस्टीनभोवती गोळा झालेली उच्चभ्रू मंडळी हीच गोष्ट अधोरेखित करतात, की गुन्हा हा केवळ गरिबीशी किंवा अज्ञानाशी जोडलेला नसतो तर उलट तो अनेकदा सत्तेच्या अतिसंरक्षणातून जन्माला येतो.