Epstein Files Impact : ‘एपस्टीन’चा दणका!, ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन यांना अटक

Epstein Files Update : ६६वा वाढदिवस साजरा करत असतानाच पोलिसांनी घरी जाऊन केली अटक
Andrew Mountbatten-Windsor

Andrew Mountbatten-Windsor

esakal

Updated on

Andrew Mountbatten-Windsor : जगभरात चर्चेत असणाऱ्या एपस्टीन फाईल्सचा दणका आता ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबेटन-विंडसर यांना बसला असून, त्यांना आज (गुरुवार) अटकही करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर आणि एपस्टीन फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना अटक झाली आहे.

यामुळे ही कारवाई एपस्टीन फाइल्शी जोडली जात आहे. मागील काही कालावधीत त्यांचे असेही काही फोटो समोर आले होते, ज्यांनी अँड्र्यूवर लावण्यात आलेले आरोप अधिकच गंभीर बनवले होते.

गेल्या वर्षी, आठवडाभर चाललेल्या चौकशीनंतर, अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांची प्रिन्स ही पदवी काढून घेण्यात आली होती. शिवाय, त्यांना त्यांचा रॉयल लॉज पॅलेस सोडण्यास भाग पाडण्यात आले होते.

Andrew Mountbatten-Windsor
Betel Leaf : पान खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढते का? जाणून घ्या, तज्ञांचे मत!

बकिंगहॅम पॅलेसने त्यावेळी एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की राजाचा भाऊ यापुढे अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर म्हणून ओळखला जाईल.

Andrew Mountbatten-Windsor
Ex-NSG Commander Joins BJP : बंगाल निवडणुकीआधी भाजपला मोठी ताकद; माजी 'NSG' कमांडरसह बड्या व्यक्तींचा प्रवेश

पोलिसांनी अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना त्यांचा ६६ वा वाढदिवस साजरा करत असताना या प्रकरणाच्या संदर्भात अटक केली. आज सकाळी ८ वाजता त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी वाहनांच्या ताफ्यासह पोलिस त्यांच्या घरी पोहोचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com