
Ganga River Pollution: महाकुंभ मेळ्यात आंघोळ करतानाचा व्हिडीओ तुम्ही तुमच्या इन्स्टा, फेसबुक स्टोरीजना लावले असतील किंवा ते पाहून फोमो होत असेल तर जरा थांबा आणि ही बातमी वाचा.
महाकुंभ २०२५ मध्ये आजवर जवळपास ५० कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे, मात्र जिथे हे स्नान केलं गेलं, त्या ठिकाणचं पाणी स्नानासाठी योग्य नव्हतं, असं आढळलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला दिलेल्या अहवालातच असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं आहे या अहवालात? यासंदर्भातील याचिका कुणी दाखल केली होती? तिला कधी उत्तर दिलं गेलं आणि अहवालातील म्हणण्यानुसार खरंच या पाण्यात आंघोळ केल्याने तुम्हाला धोका आहे का?