

Water Cycle
esakal
सागर रेपाळे
वृष्टी (Precipitation) ही पृथ्वीच्या जलचक्रातील सर्वात मूलभूत प्रक्रिया आहे. वातावरणातील पाणी द्रवरूप किंवा घनरूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडण्याच्या प्रक्रियेस वृष्टी म्हणतात. ही प्रक्रिया केवळ पाण्याचे पुनर्चक्रण करत नाही, तर जीवन टिकवून ठेवणे, हवामानाचे नियमन करणे आणि परिसंस्थांना आकार देणे यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. वृष्टीशिवाय नद्या आटतील, भूजल पुनर्भरण होणार नाही आणि शेती व्यवस्था कोलमडून पडेल.
वृष्टी म्हणजे काय?
वातावरणातील जलवाष्पाचे सांदरीभवन (Condensation) होऊन पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे स्फटिक तयार होतात. हे थेंब किंवा स्फटिक ढगांमध्ये तरंगत राहण्याइतके हलके नसतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे ते पृथ्वीवर पडतात. यालाच वृष्टी म्हणतात.