स्टार्टअप् मुळे सात लाखांहून अधिक जणांना मिळाला रोजगार
स्टार्टअप् मुळे सात लाखांहून अधिक जणांना मिळाला रोजगारEsakal

स्टार्टअप् मुळे सात लाखांहून अधिक जणांना मिळाला रोजगार

भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था ठरण्यासाठीही कृती आराखड्याचा उपयोग झाला. देशात सुरवातीच्या दहा हजार स्टार्टअप्ससाठी ८०८ दिवसांचा कालावधी लागला. मात्र, शेवटचे दहा हजार स्टार्टअप अवघ्या १५६ दिवसांत नोंदविले गेले


खासगी क्षेत्रात चांगल्या पगाराची व खात्रीशीर नोकरी हवी किंवा सरकारी नोकरदार असावं. नोकरीबाबत या दोन संकल्पना आपल्या मनात घर करून आहे. खासगी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान (आयटी) मध्ये नोकरी असेल तर उत्तम, अशी आपली मानसिकता झाली आहे. त्यामुळे आयटीसह वाहन उद्योग, सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र अशा काही बड्या सेक्टरमध्ये जाण्याला प्राधान्यक्रम असतो. अर्थात या क्षेत्रात असलेल्या नोकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र आता नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या या पारंपरिक क्षेत्रात स्टार्टअप्सने देखील आपले स्थान निर्माण केले आहे. (Start ups giving good employment opportunities to youths)

नावीन्यता घेऊन एखाद्या समस्येला सोडविणारे हे क्षेत्र आता रोजगार (Employment) उपलब्ध करून देण्याचे नवीन केंद्र म्हणून उदयाला येत आहे. कारण २०१६ पासून देशात स्टार्टअपच्या (Start Up) माध्यमातून एकूण सात लाख ६७ हजार ७५४ कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळाले आहे. देशाच्या औद्योगिक (Industry) क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या महाराष्ट्राने स्टार्टअपमध्ये देखील आघाडी घेतली आहे. त्यामुळेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात (Maharashtra) स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे. गेल्या साडेसात वर्षांत स्टार्टअपच्या माध्यमातून राज्यात एक लाख ४६ हजार १३२ नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com