
..तुमच्या जागांचा पैसे कमावण्यासाठी करा असा वापर....
गुंतवणूक किंवा भविष्याचा विचार करत अनेक जण वेगवेगळ्या प्रॉपर्टी मध्ये इंव्हेस्टमेंट करतात. मग ते नाईट क्लब, पब, फ्लॅट किंवा बंगलो असो. बऱ्याचदा याचा वापर केवळ एका पद्धतीने होतो. त्यामुळे सिंगल इन्कम मिळविण्यात सगळे समाधान मानतात. पण जर तुमच्या याच प्रॉपर्टीतून तुम्हाला 'डबल इन्कम' मिळाले तर? विश्वास बसत नाही ना... होय असं होऊ शकत, त्यासाठी केवळ या जागांचा 'स्मार्ट युझ' करता आला पाहिजे. (Use your space to earn extra money)
'को-वर्किंग' हा शब्द अलीकडच्या काळात खूप वापरला जातो. पण याचा आमच्या प्रॉपर्टीशी काय संबंध ? असे बऱ्याच जणांना वाटेल. तर तुम्ही तुमच्या बंगलो, रेस्टॉरंट किंवा पबचा वापर को वर्किंग स्पेस (Co working Space) म्हणून ही करू शकता. यासाठी तुम्हाला वेगळी जागा उपलब्ध करण्याची गरज नाही. पुण्यात असे बरेच प्रयोग यशस्वी ठरत आहेत. गेल्या दोन वर्षात याचे प्रमाण वाढले आहे.
को- वर्किंग स्पेस म्हणजे काय?
कोवर्किंग स्पेस हे व्यवसाय (Business) सेवेचे प्रोव्हिजन मॉडेल आहे. यामध्ये एखादी व्यक्ती किंवा काही कंपन्या, एजन्सी एकच जागा शेअरिंग पद्धतीने वापरतात. असे करताना या सर्व घटकांना त्यांचा स्पेस मिळतो, तसेच ते स्वतंत्रपणे काम करतात. इतकंच नाही तर या जागांचा वापर कार्यशाळा, परिषदा आणि बरेच काही आयोजित करण्यासाठी केला जातो.
कसा कराल तुमच्या जागेचा स्मार्ट वापर?
बंगलो : जर तुमच्याकडे बंगलो आहे, तर दिवसा तुम्ही त्या जागेचा वापर को वर्किंग साठी करू शकतात. तसेच रात्रीच्या वेळी तिथे कॅफे किंवा मिनी रेस्टॉरंट चालवू शकता. असेच काही फ्लॅट मध्ये ही करता येईल. पण फ्लॅटची जागा आणि एकूण सोसायटीचा विचार करता या जागेचा वापर बुक कॅफे आणि काऊंसलिंग थेरपी अशा दोन्ही स्वरूपात केला जाऊ शकतो.
नाईट क्लब किंवा पब : शहरातील तरुणाईची संख्या पाहता बऱ्याच ठिकाणी नाईट क्लब आणि पब आपल्याला पाहायला मिळतात. बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, कोरेगाव पार्क, विमाननगर, एरवडा अशा विविध भागात क्लब आणि पबची संख्या वाढत आहे. पण या जागांचा वापर मुख्यतः रात्रीच्या वेळी केला जातो. म्हणजेच नाईट क्लब आणि पब यांची संकल्पनाच मुळात नाईट लाईफ स्टाईलशी निगडित आहे. त्यामुळे दिवसा या जागेचा वापर को वर्किंग साठी केला जाऊ शकतो आणि रात्री हे नाईट क्लब व पब नियमित स्वरूपात चालतील.
अशा पद्धतीने जागेचा स्मार्ट युझ केल्यास डबल इन्कम मिळविणे शक्य होईल. यासाठी तुम्ही वेगवेगळे मेंबरशिप पॅकेज देखील ठेऊ शकता. लोकांच्या गरजेनुसार हे पॅकेज ठेवावेत. पुण्यातील 'फ्रायेय' नावाचे हे स्टार्टअप देखील असेच कार्य करत आहे. फ्रायेय अशाच जागांमध्ये को वर्किंग चालवत असून पुणे, दिली आणि बंगळूर येथे या स्टार्टअपने हा प्रयोग यशस्वी केला आहे.
को वर्किंग स्पेसची गरज का?
पुण्यातील को वर्किंग स्टार्टअप फ्रायेयचे संस्थापक योगेश थोरे यांनी सांगितले, " पुढील १२ ते १५ वर्षात रिमोट वर्कद्वारे काम करणाऱ्यांची संख्या १ ते १.५० अब्ज इतकी होऊ शकते. त्यामुळे वाढणाऱ्या रिमोट कर्मचाऱ्यांसाठी एक परवडणारी, सहज उपलब्ध होणारी जागा आवश्यक आहे."
कोरोना नंतर 'रिमोट वर्क'ला वाढते प्राधान्य
कोरोना काळात वर्क फ्रॉम होम हा शब्द देखील प्रसिद्ध झाला. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे बऱ्याच क्षेत्रांनी वर्क फ्रॉम होम ची सुरवात केली. याचा विशेष फायदा झाला तो म्हणजेच कंपन्यांना. अर्थात ऑफिस मधून काम सुरू असल्यावर, साफसफाई, लाईट, इंटरनेट अशा विविध गोष्टींचा खर्च हा लॉकडाऊन मुळे कमी झाला. महत्त्वाचे म्हणजेच रिमोट वर्किंग पद्धतीने कामे होऊ शकतात याकडे काळ वाढू लागला. त्यामुळे आता बऱ्याच वेळा रिमोट वर्क पद्धतीने जॉब व्हेकन्सी उपलब्ध होत आहेत
को-वर्किंग स्पेस मुळे 'रिमोट वर्क' सुलभ
वर्क फ्रॉम होम मध्ये अनेक अडचणी येतात. त्यामुळे जर रिमोट वर्क करायचे असेल तर अशा पद्धतीचे को वर्किंग ठिकाण उपयुक्त आहे. कमी अंतरावर, परवडणाऱ्या किंमतीत, हायस्पीड इंटरनेट आदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींमुळे को वर्किंग स्पेस ' रिमोट वर्क सुलभ करते. तसेच इतकंच नाही तर फ्रेंडली वातावरणात तणावमुक्त पद्धतीने काम करण्याचा आनंद.
अशी पुरवा सुविधा
- स्वच्छ वातावरण
- अफॉर्डेबल चार्जेसमध्ये वायफाय सबस्क्रिप्शन
- उत्तम इंटरनेट स्पीड
- बसण्यासाठी फ्लेक्सीबल सेटिंग स्पेस/पर्याय
- सुरळीत वीज पुरवठा
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”