Share Market : लोकसभा निवडणुकीच्या वर्षात कोणते शेअर ठरतील आकर्षक?

जाणून घ्या, मार्केटमधील दहा महत्वाच्या कंपन्यांची स्थिती
share market and loksabha election
share market and loksabha electionesakal


सिद्धार्थ खेमका
(मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.)


नववर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत शेअर बाजारात चढ-उतार अनुभवायला आले आहेत. यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्याने शेअर बाजाराकडे सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या शेअर बाजारात कोणत्या शेअरकडे लक्ष ठेवले पाहिजे, कोणते शेअर आकर्षक ठरू शकतात, यावर एक नजर.
(उद्दिष्टपूर्ती अपेक्षित कालावधी ः एक वर्ष)

१) स्टार हेल्थ (उद्दिष्ट : रु. ७३०) : स्टार हेल्थ ही भारतातील रिटेल हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असून, पुढील दोन ते तीन वर्षांत तिला कार्यक्षेत्रात साधारण २० टक्क्यांच्या आसपास चक्रवाढ वार्षिक विकासदराची अपेक्षा आहे.

सेवेसाठी छोट्या शहरांवर भर, नव्या बँक ॲश्युरन्स भागीदारांशी सहयोग व डिजिटल विक्रीतील वाढीव वाटा, हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरतील.

रिटेल हेल्थ इन्शुरन्स व्यवसायाच्या भक्कम प्रगतीच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या एकूण हप्ता उत्पन्नाचा चक्रवाढ वार्षिक विकासदर अर्थवर्ष २३ ते २६ या काळात १९ टक्के राहाण्याचा अंदाज आहे.

२) मेट्रो ब्रँड्स (उद्दिष्ट : रु. १५३०) : मेट्रो ब्रँड्स कंपनीला विकासाचा भक्कम मार्ग खुला असल्याने तिच्याबाबत आशावाद बाळगता येतो.

अंतर्गत स्रोतांमधून मोठा वित्तपुरवठा, ‘ओसीएफ’चे ‘ईबीआयटीडीए’शी असलेले ५० टक्क्यांहून अधिक भक्कम गुणोत्तर, ताळेबंदात प्रतिबिंबित झालेली स्टोअरची उत्कृष्ट आर्थिक कामगिरी आणि गुंतवलेल्या भांडवलावरील परताव्याचा ५० टक्क्यांहून अधिक सुदृढ दर ही त्याची कारणे आहेत.

‘फिला’ व ‘फूट लॉकर’ या ब्रँडना असलेली वाढीव संधी कंपनीच्या पुढील प्रगतीला चालना देईल. अर्थवर्ष २४ ते २६ अखेर कंपनीच्या महसुलाचा चक्रवाढ वार्षिक विकासदर २१ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

३) किर्लोस्कर ऑइल (उद्दिष्ट : रु. ८४०) : किर्लोस्कर ऑइल कंपनीकडे पॉवरजेन गटात ‘सीपीसीबी-२’, ‘सीपीसीबी फोर प्लस’ व ‘फ्युएल अग्नॉस्टिक इंजिन्स’ या प्रकारातील उत्पादनांचा भक्कम संग्रह आहे. त्याखेरीज ही कंपनी दीर्घकालीन प्रगतीसाठी विक्रीपश्चात सेवा व निर्यातीचा विस्तार करत आहे.

तिने ‘सीपीसीबी फोर प्लस’ सुसंगत उत्पादनांत ३७ डिझेल जनसेट सादर केले आहेत. अर्थवर्ष २४ ची चौथी तिमाही ते अर्थवर्ष २५ ची पहिली तिमाही या काळात हे परिवर्तन होईल, या अपेक्षेने हे पाऊल उचलले आहे.

त्यातून २० टक्के आणि ४० टक्के वाढीव किंमतीचा लाभही मिळेल. कंपनीला पुढील दोन वर्षांत नफ्यात सुधारणेसाठी वाव आहे. विक्री व निर्यातीतील वाढीव वाटा त्यामागे कारणीभूत ठरेल.

अर्थवर्ष २३-२६ काळात कंपनीचा महसूल व निव्वळ नफा यांचा चक्रवाढ वार्षिक विकासदर अनुक्रमे १६ टक्के व २५ टक्के राहील आणि नफ्याच्या प्रमाणात १७० अंकांनी सुधारणा होईल, असा अंदाज आहे.

४) बिर्ला कॉर्पोरेशन (उद्दिष्ट : रु. १८००) : बिर्ला कॉर्पोरेशन आपली ग्राइंडिंगची क्षमता सध्याच्या प्रतिवर्ष २० दशलक्ष टनांवरुन अर्थवर्ष २६ पर्यंत २५ दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याची योजना आखत आहे.

मुकूटबन प्रकल्पाची क्षमता वाढवल्यानंतर आता कंपनी मध्य प्रदेशात मैहर येथे दुसरी क्लिंकर लाईन स्थापित करणार असून, उत्तर व मध्य भारतात ग्राइंडिंग प्रकल्पही सुरू करणार आहे. अर्थवर्ष २४ अखेर कंपनीचा क्षमता वापर साधारणपणे ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत पोचेल, असा अंदाज आहे.

५) टाटा मोटर्स (उद्दिष्ट : रु. ९००) : जागतिक प्रवासी वाहनांच्या मागणीत झालेली सुधारणा, भक्कम मागणी व अनुकूल उत्पादनांचा संच यामुळे टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोव्हर या उपकंपनीच्या कामगिरीतही सुधारणा होत असून ती पुढील काळात सुरूच राहील.

अर्थवर्ष २३-२५ काळात जॅग्वार लँड रोव्हरच्या उलाढालीचा चक्रवाढ वार्षिक विकास दर १४ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. तिचा भारतातील व्यापारी वाहनांचा व्यवसाय दमदार वाटचाल करत आहे.

हलक्या व्यापारी वाहनांची प्रगती सपाट राहील आणि नव्या उत्पादनांमुळे प्रवासी वाहन व्यवसायात शाश्वत सुधारणा घडेल. त्याचा चक्रवाढ वार्षिक विकासदर आठ टक्क्यांच्या आसपास राहील, ज्यामुळे बाजारपेठेतील हिस्सा वाढण्यास मदत होईल.

६) टायटन (उद्दिष्ट : रु. ४३००) : यंदा विवाहसोहळे विक्रमी संख्येने होतील, या पार्श्वभूमीवर टायटन कंपनीला त्याचा लाभ मिळेल. पुढील एकाच महिन्यात भारतात ३५ लाख विवाह होण्याचा अंदाज असल्याने, त्यातून ४.३० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.

सध्याच्या पाच लाख कोटी रुपये उलाढालीच्या या बाजारपेठेत ‘टायटन’चा हिस्सा सात टक्क्यांच्या आसपास आहे आणि प्रगतीला आणखी संधी आहेत.

अर्थवर्ष २३-२५ अखेर कंपनीचा निव्वळ नफा चक्रवाढ वार्षिक विकासदर १८ टक्के राहील, असा अंदाज आहे.

७) लेमन ट्री (उद्दिष्ट : रु. १५०) : लेमन ट्री कंपनी हॉटेलमधील ३३५४ व्यवस्थापित खोल्या विकसित करत असून, त्या अर्थवर्ष २०२७ पर्यंत कार्यान्वित होतील, त्यामुळे कंपनीचा व्यवस्थापित खोल्यांच्या बाजारपेठेतील हिस्सा ५५ टक्क्यांपर्यंत जाईल.

त्यातून भारतात अलिकडे काही मोठी परिषद केंद्रे उघडली गेली असल्याने या बाजारपेठेच्या गतीत फार मोठे परिवर्तन होईल आणि हॉटेल क्षेत्राला फायदा होईल. अर्थवर्ष २३-२६ काळात कंपनीच्या निव्वळ नफ्याचा चक्रवाढ वार्षिक विकासदर ३८ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

८) ओएनजीसी (उद्दिष्ट : रु. २७०) : ‘ओएनजीसी’ने हातात घेतलेल्या २३ प्रकल्पांच्या बळावर आपले तेल उत्पादन अर्थवर्ष २३ मधील ४० दशलक्ष टन क्षमतेवरुन अर्थवर्ष २८ पर्यंत ५० दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कंपनीने ओएनजीसी पेट्रो ॲडिशन्स लि.मध्ये १८० अब्ज रुपये गुंतवणुकीची योजना आखली असून, भांडवली हिस्सा ९६ टक्क्यांपर्यंत नेला आहे.

सरकारने नव्या विहिरींतून वायू वापरास परवानगी दिल्यास नवी कंपनी अर्थवर्ष २५ पर्यंत नफाक्षम होईल, अशी व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.

ओएनजीसी विदेश लि.चे मध्यम काळातील तेल उत्पादन उद्दिष्ट १५ दशलक्ष टन असून, अर्थवर्ष २४ चा अंदाज ११ दशलक्ष टनांचा आहे.

कंपनीला अर्थवर्ष २५ पर्यंत आपले सर्वोच्च तेल उत्पादन दिवसाला ४५ हजार बॅरल वाढण्याची अपेक्षा आहे आणि खोऱ्यातील वायू उत्पादन दिवसाला १० दशलक्ष मेट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटरपर्यंत वाढण्याच्या तयारीत आहे.

share market and loksabha election
Share Market: जास्त भांडवलवृद्धी हवी असेल तर याचा अभ्यास हवाच..


९) एचसीएल टेक (उद्दिष्ट : रु. १८८०) : ‘एचसीएल टेक’ कंपनीने अर्थवर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी भक्कम आर्थिक कामगिरीचे निकाल सादर केले आहेत.

तिमाही आधारावर महसुलात स्थिर चलनाच्या परिभाषेत सहा टक्के वाढ झाली आहे आणि त्याला ‘एचसीएल सॉफ्टवेअर’च्या ३४ टक्के तिमाही आधारावरील वाढीमुळे चालना मिळाली आहे.

अर्थवर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीतही कंपनी सुदृढ वाढ दाखवून देण्याचा विश्वास बाळगून आहे. व्याज व करपूर्व उत्पन्नाचे १८ ते १९ टक्के प्रमाण तिने राखले आहे. वर्ष २४ मध्ये आयटी सेवा क्षेत्रात ‘एचसीएल’ हा आमच्या सर्वाधिक पसंतीचा शेअर आहे.

अर्थवर्ष २३-२६ अखेर निव्वळ नफ्याचा चक्रवाढ वार्षिक विकासदर १२.७ टक्के राहील आणि नफ्याचे प्रमाण अर्थवर्ष २६ मध्ये १९.२ टक्क्यांनी सुधारेल.

१०) आयआयएफएल फायनान्स (उद्दिष्ट : रु. ८००) : आयआयएफएल फायनान्स कंपनीकडे पुढील पाच वर्षे व्यवस्थापनाखालील मालमत्तांमध्ये वाढ अनुभवण्याची ताकद आहे.

अर्थवर्ष २५-२६ काळात शाखा व कर्मचारीसंख्येत वाढ साधारण राहील आणि कंपनी म्युच्युअल फंड गुंतवणुकीची विविध क्षेत्रे, गृहकर्जे व सोने व्यवसायांत उत्पादकता सुधारणेवर भर देईल; तसेच ‘क्रॉस सेलिंग’ सुधारण्यासाठी डिजिटल क्षमतांचाही फायदा उठवेल, पुनरावृत्ती ग्राहक वाढवेल व ग्राहक मिळविण्यावरील खर्च कमी करेल.

(लेखक मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.च्या रिटेल रिसर्च, ब्रोकिंग अँड डिस्ट्रिब्युशन विभागाचे प्रमुख आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)
------------

share market and loksabha election
Share Market Today: आज इंट्राडेमध्ये पैसे कमावण्याची सुवर्ण संधी; तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com