menstrual cycleEsakl
प्रीमियम ग्लोबल
फक्त मासिक पाळीचा त्रास म्हणून तिने स्वतःला संपवलं? मासिक पाळी आणि मानसिक आरोग्य यांचा समतोल कसा साधावा?
आजकाल मासिक पाळी येण्याचे वय बऱ्यापैकी अलीकडे म्हणजे ९ ते १० वर्षातच आलेले दिसते
पुणे : तिचं वय फक्त चौदा वर्षाचं! तिला पहिल्यांदाच मासिक पाळी आली आणि त्यात होणार त्रास सहन न झाल्याने तिने स्वतःला संपवलं असावं असं पोलिसांचं म्हणणं आहे. मुंबईतील मालवणी लक्ष्मी चाळीत ती आपल्या कुटुंबासमवेत राहत होती.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार वयाच्या चौदाच्या वर्षी तिला मासिक पाळी आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासिक पाळीबाबत माहिती नसल्यामुळे १४ वर्षीय मुलगी तणावाखाली होती. कुटुंबीय बाहेर गेलेले असताना मंगळवारी २६ मार्च २०२४ रोजी तिने स्वतःला संपविले.

