इस्त्रोची सुरुवात जुन्या चर्चमध्ये झाली होती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISRO}
या मोहिमेद्वारे तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात ७ दिवस राहणार आहेत.

इस्त्रोची सुरुवात जुन्या चर्चमध्ये झाली होती...

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) महात्वाकांक्षी मानवी अवकाश मोहीम ‘गगनयाण' हाती घेत आहे. लवकरच जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे. देशाच्या अवकाश विज्ञानाच्या वाटचालीतील ही एक महत्वपुर्ण घटना आहे देशाच्या अवकाश विज्ञानातील प्रगती बघता ही सर्व देशबांधवांसाठी अभिमानाची घटना ठरणार आहे. आपल्या देशाची अवकाश शास्त्रातील वाटचाल कधी आणि कशी सुरु झाली. त्याचा इतिहास काय आहे. आपल्या पुवर्जांनी अवकाश शास्त्रात काही योगदान दिले आहे का नाही. हे आज आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात.

हेही वाचा: ''त्या शब्दाचा उच्चार म्हणजे गानसम्राज्ञीच्या भात्यामधला लक्षवेधी बाण होता... ''

भारताच्या संस्कुतिक जडण घडणीच्या इतिहासाची सुरवात जशी वेदांपासून होते. तशी तिथुनच वैज्ञानिक इतिहासाची सुरवातही होते. इसवीसन पूर्व १५०० च्या आधी वेदांमध्ये वेदांग ज्योतिषाची रचना करण्यात आल्याचे इतिहासकार संगतात. तत्कालीन ग्रीक देशातील अवकाश संशोधकांवरही भारतीय अवकाश संशोधनाचा प्रभाव होता. या बद्दलचे संशोधन अमेरिकेतील इतिहासाचे अभ्यासक डेव्हिड पिंगरी यांनी केले आहे. यांच्या संशोधनानुसार भारतीय पौलीसा सिद्धांताचे ग्रीक रुपांतरण रोमाका सिद्धांत म्हणून ओळखले जाते आणि हे संशोधन ‘वेदांग ज्योतिष’ पासून प्रभावित असल्याचे ते म्हणतात. पुढे इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात आर्यभट्ट यांनी ‘आर्यभटीय’ या ग्रंथाची रचना केली. यातील पहिले प्रकरण ‘गीतिकापदम’ अवकाशातील दैवी शक्तीबद्दल माहिती देणारे आहे. या ग्रथातील ‘गानितपदा’ प्रकरणात गणित आणि ‘कालक्रिया’ या प्रकरणात पृथ्वी आणि अवकाशासंबंधीची माहिती दिली आहे. त्या काळी पृथ्वी वरील एक वर्ष हे ३६५ दिवस,सहा तास, १२ मिनिट आणि ३० सेकंदाचे आहे असे आर्यभट्टाने दर्शविले आहे. की जे आधुनिक वैज्ञानिक माहितीनुसार पक्त ३ मिनिटे आणि २० सेकंदानी मोठे आहे. इतक्या अचुक पद्धतीने आयर्भट्टांनी गणिती प्रक्रीया पुर्ण करुण वेळेचे आणि अंतराचे विवरण दिले आहे.

प्रसिद्ध भारतीय गणिती ब्रह्मगुप्त (इ.स. ५९८ ते ६६८) यांनी ‘ब्रह्मगुप्त सिद्धांत’ या ग्रंथाचे लेखन केले आहे. यामध्ये ग्रहनासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. पुढे ‘महाभास्करीय’ ग्रंथातून भास्कर पहिले (इ.स.६२९) यांनी ग्रहांच्या लंबवर्तुळाकार कक्षांबद्दल भाष्य केले. इसवी सन १११४ मध्ये भास्कर दुसरे यांनी सिद्धांतशिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला. ज्यामध्ये ग्रहांची स्थाने, ग्रहणे, भूगोलिक माहिती होती. यासाठी त्यांनी उज्जैन जवळील वेधशाळेचा वापर केला होता. पुढे श्रीपती आणि महेंद्र सुरी यांनी १४ व्या शतकात अवकाश विज्ञानात महत्वपुर्ण योगदान दिले. नीलकंठ सोमय्या (इ.स.१४४४ ते १५४४) यांनी आर्यभट्ट सिद्धांताचा वापर करत बुध आणि शुक्र ग्रहाच्या परिवलनाचा अभ्यास केला होता. त्यांनी केरळ अवकाश संशोधन पिठाची स्थापना केली. पुढे पंधराव्या शतकात अच्युत पिषारटी यांनी ‘स्फुटनिर्णय’ नावाच्या ग्रंथाची रचना केली. यामध्ये ग्रहणांसंबंधी आधुनिक पद्धतीने मांडणी केली होती.

हेही वाचा: भारतीय हेरखात्याचा 'ब्लॅक टायगर'...

देशावर झालेल्या परकीय आक्रमणाच्या कालखंडात अवकाश संशोधनात देश म्हणून आपण भरीव योगदान देऊ शकलो नाही. तरीही सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९१० ते १९९५) यांनी अवकाशाच्या विस्तारण्याचा दर अर्थात चंद्रशेखर लिमिट ची देणगी जगाला दिली. मेघानंद सहा (१८९३-१९५६) या कालखंडात दिलेली सहा समीकरणे जगप्रसिद्ध आहे. ताऱ्यांमधील रासायनिक अभिक्रियाचा अभ्यास सहा यांनी केला आहे. स्वातंत्रोत्तर कालखंडात १९६२ साली विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात अवकाश संशोधनासाठी राष्ट्रीय समितीचे गठण करण्यात आले. पुढे १९६९ साली अधिकृतरित्या भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रो ने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ रशियाच्या क्षेपनास्राने १९ एप्रिल १९७५ साली प्रक्षेपित केला. १९८० मध्ये ‘रोहिणी’ नावाचा उपग्रह स्वदेशी प्रक्षेपक ‘उपग्रह प्रक्षेपक यान-३’ (एस.एल.व्ही.) द्वारे अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. इस्रोने अद्ययावत धृवीय प्रक्षेपक यान (पी.एस.एल.व्ही) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान (जी.एस.एल.व्ही.) या प्रक्षेपक यानांची निर्मिती केली आहे. या प्रक्षेपक यानातून इस्रोने अनेक दळणवळण, दिशादर्शक आणि संरक्षण उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.

एस.एल.व्ही.प्रक्षेपक यानातून सुरवातीच्या काळात तीन उड्डाण करण्यात आले होते. या मधून ४० किलोग्रॅमपर्यंतचे उपग्रह ५०० किलोमीट उंचीवर सोडले जात. १९८३ मध्ये या प्रक्षेपकाने शेवटचे उड्डाण घेतले. धृवीय प्रक्षेपक यानाची (पी.एस.एल.व्ही.) निर्मिती १९९३ मध्ये रशियाच्या मदतीने करण्यात आली. पी.एस.एल.व्ही. चे आतापर्यंत ४८ उड्डाणे झाली आहे. मंगळयान आणि चांद्रयान-१ चे उड्डाणही याच प्रक्षेपाकातून करण्यात आले होते. १०४ उपग्रह अवकाशातील विविध कक्षांमध्ये सोडण्याचा विश्वविक्रमही याच यानातून करण्यात आला. सध्या इस्रोकडे असलेले सर्वात अद्ययावत आणि जास्त वजनाचे उपग्रह जास्तीत जास्त उंचीवर नेणारे ‘भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक यान’ उपलब्ध आहे. ५ टना पर्यंतचे उपग्रह अवकाशातील खालच्या भ्रमणकक्षेत हा प्रक्षेपक सहज सोडू शकतो. सुरवातीला रशियाकडून क्रायोजेनिक इंजिन विकत घेतले होते नंतर इस्रोने स्वतः त्याची निर्मिती केली. जी.एस.एल.व्ही.मार्क-१ हे २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. या प्रक्षेपक यानाच्या निर्मितीची सुरवात २००१ मध्येच करण्यात आली होता. २०१० मध्ये करण्यात आलेला स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापराचा प्रयोग अयशस्वी ठरला. मात्र २०१४ मध्ये स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन वापरून इस्त्रोने केलेले पहिले प्रक्षेपण यशस्वी ठरले. हे तंत्रज्ञान प्राप्त करणारा भारत हा जगातला सहावा देश ठरला आहे. चांद्रयान-२ साठी याच प्रक्षेपकाच्या तिसऱ्या पिढीचा वापर करण्यात आला आहे.

क्षेपणास्त्रांचे दिशादशर्न, मोबाईलचे जीपीएस, विमाने आणि उपग्रहे यांच्या दिशादशर्णसाठी भारताने स्वदेशी दिशादशर्क प्रणाली गगण ची निमिर्ती केली आहे. भारतीय विमान प्राधिकरण आणि इस्रो यांनी संयुक्तरीत्या ही प्रणाली (जी.पी.एस.) विकसित केली आहे. नुकतेच २०१४ पासून तिचे पूर्णपणे कार्यान्वयन करण्यात आले आहे. यामुळे स्वतःची दिशादशर्क प्रणाली असलेल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. इस्त्रो आणि DRDO यांनी संयुक्तपणे नुकतीच उपग्रह भेदी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी केली आहे. त्यामुळे अवकाश क्षेत्रात आणि पयार्याने अवकाश युद्धातही देशाचा दबदबा वाढला आहे. असे तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातला चौथा देश आहे. पडक्या चर्चपासून सूरु झालेला इस्त्रोचा प्रवास आता मंगळापर्यंत पोहचला आहे. चंद्रावर बफर्च्या स्वरुपात पाण्याचे अवशेष असल्याचे चंद्रयान-१ ने सिद्ध केले. अत्यंत कमी किमतीत केलेल्या मंगळयानाने मंगळ ग्रहासंबंधीच्या माहीतीत भर पाडली. प्राचीन काळात अवकाश निरीक्षणावरुण आणि गणिती प्रक्रीयांच्या आधारवर ग्रह, ताऱ्यांचे अंतर सांगणाऱ्या भारतीय संशोधकांचे वंशज आज चंद्र आणि मंगळावर मोहीमा नेत आहे. देशाच्याच नव्हे तर संपुर्ण मानवसृष्टीसाठी अवकाश संशोधनात इस्त्रो चमकदार कामगिरी करेल यात काही शंका नाही.

गगनयान विषयी -
या मोहिमेद्वारे तीन भारतीय अंतराळवीर अवकाशात ७ दिवस राहणार आहेत. असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. ही मोहिम सन २०२3 पर्यंत पूर्ण होईल असा प्राथमिक अंदाज आहे.या मोहिमेसाठी भारत सरकारने १०,००० कोटी रूपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पासाठी भारताने रशिया व फ्रांससोबत आवश्यक तो करार केला आहे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top