राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांना योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री देऊन सन्मानित केले
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांना योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री देऊन सन्मानित केले- Esakal

Swami Shivanand Fitness : पद्मश्री सन्मानाचा १२५ व्या वर्षी ‘योग’

बरेच जण एक फॅशन म्हणून किंवा दुसरा करतो म्हणून व्यायाम, योगासने करतात. काही जण हजारो रुपये खर्च करून जीम लावतात. खास ट्रेनरकडून आपली बॉडी बनवतात. पण काही जणांना स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी किंवा सुदृढ जीवनासाठी या गोष्टींची गरज भासत नाही. कारण या व्यायाम किंवा योग या गोष्टी त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनलेला असतो
Published on

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांना योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री देऊन सन्मानित केले. वाराणसीहून आलेल्या स्वामी शिवानंद यांच्याबद्दल असे म्हटले जाते की वयाच्या १२५ व्या वर्षीही ते पूर्णपणे निरोगी आहेत. वाराणसीचे रहिवासी असलेले स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी झाला होता. त्यांना चकचकीत जगापासून दूर राहणे आवडते. योग आणि धर्माची आवड असलेले स्वामी शिवानंद रोज पहाटे तीन वाजता उठतात आणि योगासने करतात. याशिवाय ते भगवद्गीता आणि माँ चंडीच्या श्लोकांचे पठण करतात. (Swami Shivanand fitness at the age of hundred and twenty five years)

बरेच जण एक फॅशन म्हणून किंवा दुसरा करतो म्हणून व्यायाम, योगासने करतात. काही जण हजारो रुपये खर्च करून जीम लावतात. खास ट्रेनरकडून आपली बॉडी बनवतात. पण काही जणांना स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी किंवा सुदृढ जीवनासाठी या गोष्टींची गरज भासत नाही. कारण या व्यायाम किंवा योग या गोष्टी त्यांच्या जीवनाचाच एक भाग बनलेला असतो. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे १२५ वर्षीय स्वामी शिवानंद. भारत सरकारने पद्मश्री सन्मान देऊन त्यांच्या योगसाधनेचा गौरव केलेला आहे. त्यांच्या आधारकार्ड व पासपोर्टवर त्यांची जन्मतारीख ८ ऑगस्ट १८९६ अशी आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com