Maharashtra Electricity Distribution Company: वीज मंडळाची सुरक्षा ठेव आणि ग्राहक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणरणच्या सुरक्षा ठेवींमागचा कार्यकारणभाव}
जाणून घ्या...का भरणे आवश्यक आहे वीज मंडळाची सुरक्षा ठेव

वीज मंडळाची सुरक्षा ठेव आणि ग्राहक

एकीकडे वाढते तपमान आणि दुसरीकडे कोळशाची टंचाई, त्यातून होणारे भारनियमन अशा कात्रीत नागरीक सापडले आहेत. महावितरणकडून अशा परिस्थितीमध्ये नागरीकांना सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल पाठविले जात आहे. यापूर्वी एक महिन्यांच्या बिला एवढी सुरक्षा ठेव आकारली जात होती. काय आहे हे सुरक्षा ठेवीमागचे गणित.....(Article about Security Deposit by Electricity Company of Maharashtra)

यंदा प्रथमच दोन महिन्यांची ठेवीची बिले (Security Deposit) नागरीकांना आली आहेत. त्यातून नागरीकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. तर काही नागरीकांकडून सुरक्षा ठेव भरण्यास विरोध होत आहे. त्यात आता राजकाणाचा (Politics) शिरकाव झाल्याने संभ्रमात आणखी भर पडली आहे.

महावितरणाप्रमाणे (MSEDCL) सरकारच्या मालकीच्या अनेक कंपन्याची ही अवस्था आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांची अशी अवस्था करून त्या खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याची ही जुनीच पद्धत आहे.

हीच पद्धत महावितरणच्या तिन्ही कंपन्यांबाबत सध्या सुरू आहेत. महावितरणचे खासगीकरण झाले, तर त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसणार आहे. त्यामुळे याचा गंभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महावितरण कंपनीकडून देखील वारंवार या सुरक्षा ठेवीबाबत नागरीकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दर पाच वर्षींनी विजेचे दर महावितरणकडून निश्‍चित करून महाराष्ट्र राज्य वीज नियमाक आयोगापुढे सादर केले जातात. त्यावर आयोगाकडून राज्यात सुनावणी घेतली जाते. नागरीकांना बाजू मांडण्याची संधी दिली जाते. सारासार विचार कडून आयोग महावितरणाच्या प्रस्तावात आवश्‍यक ते बदल करून त्यास मान्यता देते.

आयोगाने मान्यता दिल्यानंतर महावितरणकडून वाढ लागू केली जाते. त्यानुसार महावितरणकडून बहुवर्षीय वीजदर विनिमय २०१९ नुसार वीजदर ठरवून मिळावेत यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी आयोगाने ३० मार्च २०२० रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतच्या म्हणजे पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी बहुवर्षीय वीजदर निश्‍चित करून त्यांचे आदेश दिले. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी १ एप्रिल २०२० पासून नवीन वीजदर निश्चित करून लागू करण्यात आले.

आयोगाच्या या आदेशानुसार १ एप्रिल २०२२ पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी सध्या करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवण्यात आले आहेत. मात्र नियमित वीजबिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल महावितरणकडून या महिन्यात ग्राहकांना देण्यात आले. सुरक्षा ठेवीचे बिल हे नियमानुसारच आहे. आयोगाने विद्युत पुरवठा संहिता, वितरण परवानाधारकांच्या कृतीचे मानके व पॉवर क्वॉलिटी विनिमय २०२१ च्या मसुद्यावर ग्राहकांकडून तसेच परवानाधारकांकडून सूचना, हरकती, अभिप्राय मागविले होते. ते विचारात घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर विनिमय जारी केले आहे.

त्यातील विनिमय क्रमांक १३ नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. या तरतूदीनुसार महावितरणकडून वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीमधील रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिल देण्यात आली आहेत. तसेच जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिल भरल्यानंतर ते तुमच्या पुढील काळात व्याजाची रक्कम बिलातून वळती करण्यात येणार. त्यामुळे सुरक्षा ठेवीचे बिले भरली, तरी ग्राहकांना ती बिलातून वगळती करून मिळणार असल्यामुळे याबाबत कोणतीही शंका बागळण्याचे कारण नाही.

अशी ठरते सुरक्षा ठेवीची रक्कम
ग्राहकांचा सरासरी वीजवापर कमी झाला असल्यास सुरक्षा ठेवीमधील जादा रक्कम देखील त्यांच्या वीजबिलामध्ये समायोजित करून देण्यात येत आहे. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधी जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते.

यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे.

सुरक्षा ठेव हप्त्यात भरण्याची सोय
नवीन तरतुदीनुसार एप्रिल महिन्यामध्ये वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. मात्र या बिलाची रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासंबंधीची माहिती सुरक्षा ठेवीच्या स्वतंत्र बिलावर नमूद करण्यात आली आहे. तसेच ज्या ग्राहकांचा वीज वापर कमी असेल किंवा झाला असेल मात्र त्या तुलनेत नियमानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम अधिक असेल तर सुरक्षा ठेवीची जादा रक्कम पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये समायोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते.

त्यामुळेच महावितरणकडून वारंवार वीजग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे. यापूर्वी महावितरणकडून सुरक्षा ठेव ग्राहकांकडून आकारण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने महावितरण सध्या आर्थिक अडचणीत आहे. हीच परिस्थीती राहिली, तर येत्या काही वर्षात खासगीकरणाशिवाय पर्याय राहणार नाही.जर खासगीकरण झाले, तर नागरीकांना बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे भविष्याची ही गरज ओळखून सरकारी मालकीची ही कंपनी वाचविण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे. तशीच ती तुमची-आमची देखील आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”
go to top