पुण्याच्या अनुष्काचं संगीत क्षेत्रात दमदार आगमन

पुण्याच्या अनुष्काचं संगीत क्षेत्रात दमदार आगमन

नवी तरुण पिढी कोणता विचार करते, कशी व्यक्त होते याकडे सर्वांचेच कायम लक्ष असते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सर्वांसाठीच खूप वेगळा अनुभव देणारी ठरली. तरुणपिढी तर यात खूप भरडून निघाली; कारण ऐन तारुण्यात त्यांना घरात बसून राहणे भाग पडले. पण, काही तरुण-तरुणी याला अपवाद ठरले. कारण, त्यांनी त्यांच्या ऊर्जेला एक वेगळी वाट करून दिली. अशीच एक कोरोनाच्या काळात व्यक्त झालेली तरुणी म्हणजे १८ वर्षीय अनुष्का नाईक (Anushka Naik), जिचं एवढ्या लहान वयात गीतकार-संगीतकार म्हणून ‘अब घन’ (Ab Ghan) हे गाणं ‘झूम रेकाॅर्ड’ (Zoom Record) या तरुण कलाकारांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या म्युझिक कंपनीने नुकतेच प्रदर्शित केले. (Pune Based Anushka Naik Song Sung by singer Shankar Mahadevan)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com