'न्युड कॉल' येतोय? सावध राहा! तुम्हीही होऊ शकता 'सेक्‍सटॉर्शन'चे शिकार

विजयच्या व्हॉटस्‌अपवर त्याचा "तो' व्हिडीओ येऊन धडकला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
'न्युड कॉल' येतोय? सावध राहा! तुम्हीही होऊ शकता 'सेक्‍सटॉर्शन'चे शिकार

संगणक अभियंता विजय एक वर्षापासून घरुनच लॅपटॉपवर काम करत होता. करमणुकीसाठी फावल्या वेळेत विजय फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्ठिटरवर सक्रीय राहायचा. एक दिवस त्याच्या फेसबुकवर अचानक एका अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. आता मुलगी म्हंटल्यावर फ्रेंड रिक्वेस्ट कोण नाकारेल. विजयनेही क्षणार्धात तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यानंतर हळूहळू त्या तरुणीने विजयशी संवाद वाढविला. एवढेच नव्हे, तर त्यांच्यात व्हॉटसअप कॉलही सुरू झाले. दोघांची "व्हच्युर्अल फ्रेंडशीप' जरा जास्तच पुढे गेली. एकदा तर तिने व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करून विजयला नग्न (न्युड कॉल) होण्यास सांगितले. सुरूवातीला आढेवेढे घेतल्यानंतर विजयने होकार दर्शविला. त्यानंतर ती म्हणेल, त्याप्रमाणे त्याने त्या कॉलसमोर नग्न होऊन वेगवेगळ्या बाजुने स्वतःला दाखविण्यास सुरूवात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com