''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''

कोणत्याही मोहाळा बळी न पडता प्रेम नव्हे तर पदच मिळविणे हेच ध्येय आहे.
''स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही?''
Updated on: 

- अमोल अवचिते

अधिकारी होण्याच्या जिद्दने पेटून उमेश सकाळी ६ वाजताचा त्याच्या रूम मधून अभ्यास करण्यासाठी निघाला होता. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. गावात असणाऱ्या त्याच्या आईवडिलांची त्याला आठवण येत होती. पहाटेच उठून गोठ्यातील शेण काढताना जनावरांच्या हंबरण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला की त्याला आनंद वाटायचा. मात्र पुण्यात आल्यापासून कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज एकाला तरी त्याला आनंदून जायचे. धारा काढत असतानाच कोरं (कच्चे) दूध पिण्याची त्याची सवय. पुण्यात आल्यापासून या गोष्टी कधी मागे पडल्या होत्या हे त्याला ही समजले नव्हते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com