राज्यातील पर्यटकांना भूरळ घालतायेत पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले!

राज्यातील पर्यटकांना भूरळ घालतायेत पुणे जिल्ह्यातील गडकिल्ले!

पुणे आणि पर्यटन, याचा विचार करावयाचा झाल्यास, आपणाला पटकन आठवतात ते लाल महाल, शिंदे छत्री, सारसबाग, खडकवासला धरण व चौपाटी, सिंहगड, पर्वती, शनिवारवाडा, देहू-आळंदी, लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे, मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर व लेण्याद्री हे पाच अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर येथील शंकराचे मंदिर, शिवनेरी, सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर, लोहगाव, विसापूर आदी किल्ले, चाकण येथील भुईकोट किल्ला, आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराजांची समाधी, देहू ही संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी आदींसह अनेक पर्यटनस्थळे राज्यभरातील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरली आहेत. राज्य पर्यटकांना भूरळ पाडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी सविस्तर माहिती देणारा लेख.

पुणे तिथे काय उणे, अशी बोली भाषेत बोलली जाणारी म्हण आपणा सर्वांना परिचित आहेच. पण ही म्हण फक्त पुणे शहरापुरतीच मर्यादित आहे. याच्या पलीकडेही जाऊन पुणे जिल्ह्याची खरी ओळख ही पर्यटनस्थळांचा जिल्हा अशी आहे. मात्र अनेकांना याबाबत फारशी माहिती नाही. या पर्यटन स्थळांमध्ये प्रामुख्याने गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे, तीर्थक्षेत्रे, अभयारण्य, नद्या, धरणे, प्रसिद्ध लेणी, अष्टविनायकांपैकी पाच अष्टविनायकाची मंदिरे, भाटघर धरण, बनेश्‍वर, खोडद आदींचा समावेश आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सह्याद्री पर्वताचा भाग आहे. या भागात शिंगी, तसुबाई, मांडवी, ताम्हिणी, अंबाला आदी डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्‍चंद्र डोंगर आहे. माळशेज, बोर, ताम्हिणी, वरंधा आदी महत्त्वाचे घाट आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर, तसुबाई, शिंगी ही शिखरे आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पुरंदर टेकड्या आहेत. खेड-शिवापूर येथे कमरअली दरवेश दर्गा, खोडद येथे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठीची मोठी दुर्बीण, शिवाय, मोराची चिंचोली, नारायणपूर, केतकावळे, जेजुरी आदी प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

याशिवाय नागफणी, कार्ले-भाजे, जर्सेश्‍वर, हातकेश्‍वर आणि नीलकंठेश्‍वर ही ठिकाणे एक दिवसांच्या सहलीसाठी चांगली आहेत. पुणे जिल्ह्यातील भोरे, वेल्हे, मुळशी, आंबेगाव, जुन्नर खेड हे तालुके निसर्गरम्य व दुर्गम आहेत. कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, जल पर्यटन आणि ट्रेकिंगसाठी या तालुक्यातील ठिकाणे चांगली आहेत. उन्हाळ्याचा अपवाद वगळता अन्य हंगामामध्ये फिरण्यासाठी पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला, नीरा-भाटघर, माणिकडोह, मुळशी, पवना आणि चासकमान या धरणांच्या बॅक वॉटरचा परिसरही तसा फिरण्यासारखा आहे. गिरीस्थानांमध्ये भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा हे पर्यटनासाठीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. वेल्ह्याजवळचे सिंगापूर, मोहरी येथील रायलिंग पठारावरून रायगड किल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिसणारा सनसेट (सूर्यास्त) हा पाहण्यासारखा असतो. शिवाय याच्या जोडीला वरंधा,ताम्हिणी घाट आहेतच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com