नोकरीसाठीच्या मुलाखतीत छंदाविषयीच्या प्रश्नावर उत्तर काय द्यावे?

छंद हा मुलाखतीतील एक छोटासा भाग असला तरी तो तुमच्या नोकरी मिळविण्याच्या प्रक्रियेतला मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे.
Job interview
Job interviewesakal

मुंबई : नोकरी शोधाची प्रक्रिया ही ८० टक्के लोकांना तणाव देणारी असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आली. नोकरीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुलाखतीची फेरी.

या मुलाखतीत अनेकांना घाम फुटतो, क्षमता असूनही भीतीपोटी मुलाखतीत उत्तर देता येत नाही आणि शेवटी नोकरीची संधी गमावणारेही अनेक जण आहे.

या मुलाखतीमध्ये तुमचे छंद काय असा प्रश्न हमखास विचारला जातो. विशेषत: करिअरच्या सुरुवातीला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. आता हा प्रश्न महत्त्वाचा का आहे आणि त्याचे उत्तर काय द्यावे हे समजून घेतले पाहिजे.

छंद हा मुलाखतीमधील महत्त्वाचा प्रश्न का आहे?

छंद हा मुलाखतीतील एक छोटासा भाग असला तरी तो तुमच्या नोकरी मिळविण्याच्या प्रक्रियेतला मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही कसे उत्तर देता हे खूप महत्वाचे आहे.

मुलाखतीची तयारी करत असताना अनेकदा या प्रश्नाकडे गौण प्रश्न म्हणून पाहण्यात येते आणि यावर फारसा विचार न करताच उमेदवार मुलाखतीसाठी जातात. मात्र छंद देखील तितकाच महत्वाचा घटक आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

तुम्ही माणूस म्हणून कसे आहात?

मुलाखतकर्त्याला तुमच्या शिक्षणाविषयी माहिती झालेली असते. आता मुलाखतकर्त्याची मानसिकता काय असते हे लक्षात घ्या. नोकरीसाठी ज्ञान आणि स्वभाव हे दोन निकष आहे असे समजूया. नोकरीसाठी शिक्षणातून मिळालेले ज्ञान हा प्रत्यक्ष घटक आहे.

तर तुमचा स्वभाव हा अप्रत्यक्ष घटक आहे. नोकरीत तुम्हाला टीममध्ये एकत्र काम करावे लागते. यात तुमचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच तुम्ही माणूस म्हणून कसे आहेत, तुमचे विचार किती प्रगल्भ आहेत या सगळ्याची माहिती मुलाखतकर्त्याला छंद किंवा अन्य गप्पांतून मिळते.

तसेच तुमची समाजात मिसळण्याची आवड, तुमचा स्वभाव आदी गोष्टींचा अंदाज त्यांना यातून येत असतो. तुम्ही एक माणूस म्हणून कसे आहात याचा साधारण अंदाज यातून येत असतो.

याबाबत सीए स्नेहा नायकोडे म्हणाल्या, " या प्रश्नाच्या उत्तरातून समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे हे जाणून घेता येते. त्यांचा कल नवीन गोष्टी शिकण्याकडे आहे का?

आम्हाला अनेकदा असा अनुभव येतो की मुलं म्हणतात की त्यांना टेक्नॉलॉजीची आवड आहे पण त्यांना त्यातील 'डीप नॉलेज' नसते. उलट ही मुलं सोशल मीडिया आणि तत्सम गोष्टीवर जास्त वेळ घालवणारी असतात आणि त्यांना ते तंत्रज्ञानाचं ज्ञान वाटत असतं."

Job interview
ऑफिसमधल्या Groupism वर उपाय काय?

तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?

उमेदवार जर आपल्या संस्थेत येऊन काम करणार असेल तर त्याचा एकुणातच सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे मुलाखतकर्त्याला तपासायचे असते.

यातून त्याची जगण्याकडे पर्यायाने कामाकडे पाहण्याची वृत्ती समजते. समजा एखादी व्यक्ती असेही उत्तर देऊ शकते की मला कशातच फारसा रस नाही.

माझे खास असे कोणतेही छंद नाही. यामुळे तो कामाकडेही याच नजरेतून पाहतोय का, याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे तुमचे छंद हे तुमचा एकूणच सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवत असतात.

याबाबत 'आयरिन टेक सोल्युशन ' एचआर चैत्राली कुलकर्णी म्हणाल्या, "यातून समोरच्या व्यक्तीचा कल कळतो.

पण छंद हे निमित्त असतं. त्या व्यक्तीच्या उत्तरातून तिचा खरेपणा आम्हाला तपासता येतो. समोरची व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही.

जे ते सांगतायत ते त्यांनी खरोखरच केलंय का, हे आम्ही यातून तपासत असतो. मला मला वाटतं की उमेदवारांनी कायम आयडियल उत्तरे देण्यापेक्षा खरी उत्तरे देण्यावर भर द्यावा."

Job interview
Dnyaneshwari: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

छंदांची निवड करताना

तुम्हाला अनेक प्रकारचे छंद असू शकतात मात्र सगळे छंद सांगण्यापेक्षा आपण ज्या प्रकारच्या नोकरीसाठी मुलाखत देत आहोत त्या नोकरीच्या अनुषंगाने छंदांची निवड करा. ज्यातून तुमच्यामध्ये असणारी कौशल्ये आणि गुण दिसून येतील अशांची निवड करणे जास्त योग्य राहील.

जसे की त्यातून तुमची टीम वर्क म्हणून काम करण्याची तयारी, सेल्फ मोटिव्हेशन, लीडरशिप, कम्युनिकेशन, प्रश्न सोडविण्याची हातोटी आदी गुण दिसून येतील असे छंद सांगितल्यास अधिक फायद्याचे ठरू शकते.

ज्या छंदाविषयी तुम्हाला अधिकचे प्रश्न विचारले तरी त्याची उत्तरे तुम्हाला व्यवस्थित आणि तुमची आवड दिसून येईल अशा छंदांची निवड करा.

"आम्हाला अनेकदा असा अनुभव येतो की समोरची व्यक्ती खोटी माहिती देत असते. म्हणजे वाचन असे सांगताना तिने एखादेच पुस्तक वाचलेले असते. उमेदवारांचा असा समाज असतो की वाचन हाच खूप महत्वाचा छंद आहे.

पण या पलीकडे अनेक छंद आहेत ज्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो आणि पर्यायाने कंपनीला देखील अशी मल्टी टँलेन्टेड लोकं कंपनीत असलेलं केव्हाही चांगलंच वाटतं" असेही सीए स्नेहा यांनी सांगितले.

Job interview
Half CA Trailer: कितवा प्रयत्न? C.A करणाऱ्याला असा प्रश्न विचारायचा नसतो!

एका शब्दांत किंवा एका वाक्यांत छंदाविषयी बोलणे टाळा

तुमच्या छंदाविषयी तुम्हाला किती आवड आहे हे तुमच्या उत्तरातून समोर येणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाचायला आवडतं असं उत्तर देण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या विषयातील आणि कोणाचे लिखाण वाचायला जास्त आवडते आणि का? हे जर तुम्हाला थोडक्यात सांगता आले तर त्यातून तुमची आवड, तुम्ही खरोखरच वाचताय ही विश्वासार्हता, तुमची समयसूचकता आणि नेमकेपणा समोरच्या मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यावर अधिक प्रभाव टाकणारा ठरेल.

चैत्राली म्हणाल्या, "उमेदवारांनी खरी माहिती देणं केव्हाही चांगलं. अगदी छोटीशी, कामाशी संबंधित नसलेली हॉबी असली तरीही चालेल. पण खोटं सांगितलं की उमेदवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो."

Job interview
New Job : HR शी कसं कराल सॅलरी निगोशिएशन

छंदांची माहिती तुम्ही करत असलेल्या कामातून द्या

तुमचे छंद जोपासत असताना तुम्ही त्यावर काय करत आहेत याची माहिती द्या. जसे की तुम्ही जर छंद म्हणून गाणे शिकत असाल तर त्याची माहिती द्या. त्यावर तुम्ही कसे आणि काय शिकलात याची थोडक्यात माहिती द्या.

किंवा तुम्हाला जर ट्रेकिंगला यायला आवडत असेल तर ट्रेकिंग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कसे अवश्य आहे याची माहिती द्या. तसेच तुम्ही कोणकोणत्या ट्रेक केल्यात हे थोडक्यात सांगा.

कंपनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा उत्साह दाखवू शकता

अनेक कंपन्या मॅरेथॉन, फिटनेस कार्यक्रम, निधी संकलन यासारखे उपक्रम राबवत असतात. मुख्य म्हणजे आधी संबंधित कंपनीच्या कार्यक्रमाची माहिती घ्या आणि तुमचे छान त्यांच्या कार्यक्रमासाठी जर उपयोगी पडणारे असतील तर तुमचा कंपनीच्या या कार्यक्रमात काम करण्यासाठीचा उत्साह दाखवा. यातून तुम्ही सगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असता असा मेसेज जाण्यास मदत होईल.

----------

Job interview
Interview Questions : इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या कठिण प्रश्नांचे कसे अन् काय उत्तर द्यावे? वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com