Depression : ती नैराश्यात जाते आहे हे देखील तिनेच मला फोन करून सांगितलं.. तोपर्यंत मला नैराश्य काय हेच माहित नव्हतं

२६ वर्षीय प्राचीसोबत असे काय घडले?
depression story
depression story Esakal
Updated on

पुणे : त्या दिवशी मी खारघरला यायला निघाले होते.. वाटेतच फोन आला. प्राची सतराव्या मजल्यावरून पडली आहे.. मला काही कळेना. मी जेव्हा तिकडे जायला निघाले तेव्हा वाटेतच मला मेसेज आला " सॉरी, प्राचीबद्दल ऐकून फार वाईट वाटले.." मला कळेना मला असा मेसेज का आलाय.. तोपर्यंत मला सांगण्यात आलं होतं की ती पडली जरी तरी तिची प्रकृती ठीक आहे.. मग गाडीत बसल्यावर माझ्या सहकाऱ्यांनी मला प्राची गेल्याचं सांगितलं.. आणि असं वाटलं इतके दिवस ज्या भीतीसह जगत होतो ती भीती खरी ठरली आणि ती गेली.. आज पाच वर्षे झाली तरीही हे सांगताना प्राचीची आई तिचे अश्रू थांबवू शकत नव्हती..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com