stay in Forest
stay in ForestE sakal

जंगल भटकंती आवडते? मग हा लेख वाचाच

. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने शरीर ताजेतवाने व प्रफुल्लित होते, एक प्रकारची चित्तशांती प्राप्त होते. स्थूलता, ताण आणि नैराश्य यावर मात करण्यास मदत होते

या लिखाणाचा उद्देश माणसाला ‘देवराईसारख्या गर्द जंगलापासून दूर रहा’ हे सांगणे असले तरी तो जंगलात जाणाऱ्यांना घाबरवणे असा नाही. फक्त मानव आणि जंगल यांच्यातील सहजीवनासंबंधित संभाव्य धोक्यांची जाणीव करून देणे हा आहे.

निसर्गामध्ये रममाण होणे कुणाला आवडत नाही? नदी- ओढ्यांतील पाण्याचा खळखळाट, हिरवे डोंगर, घनदाट जंगल अशा वातावरणाचे आकर्षण माणसाला असतेच. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने शरीर ताजेतवाने व प्रफुल्लित होते, एक प्रकारची चित्तशांती प्राप्त होते. स्थूलता, ताण आणि नैराश्य यावर मात करण्यास मदत होते. मन निर्मळ होते. पऺचमहाभुतांचा साक्षात्कार होतो. एकुणच काय तर निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्यांना शारीरिक-मानसिक ताण कमी होऊन उत्तम आयुष्य लाभते. असा सार्वत्रिक समज आहे आणि तो बहूतांश खरा देखील आहे. The Environment International २०१५ च्या अहवालानुसार हिरवळीच्या सानिध्यात असल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहतं, म्हणूनच जर तुम्हाला निरोगी आणि आनंदी जीवन हवे असल्यास अधिकाधिक वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा असं सांगितलं जातं. पण निसर्ग म्हणजे काय? हिरवळ आणि विशिष्ट, विरळ, ज्ञात वृक्षसंपदा असलेली उद्यानं आणि गर्द, निबिड वैविध्यपूर्ण ज्ञात-अज्ञात वृक्षराजी असलेले जंगल या दोन्हींना मानवी वास्तव्य दृष्टीने एकच मानण्याची चूक आपण करतोय का? हे लक्षात घ्यायला हवे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com